शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल ११ सप्टेंबरला;दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:45 IST

अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देकिशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरकार पक्षातर्फे तब्बल २१ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांनी या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले.

अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी २१ साक्षीदार तपासले असून, त्यामधील दोन साक्ष महत्त्वाच्या असल्याचे सांगण्यात आले.खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल व राजू मेहेर व निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात तपास केल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात आरोपींविरुद्ध हत्या करणे, पुरावे नष्ट करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले; मात्र आरोपींनी हत्या केली नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर साक्ष-पुरावे न्यायालयात झाले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरकार पक्षातर्फे तब्बल २१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने मिर्झा व दिलदार खान यांनी युक्तिवाद केला. त्याला अ‍ॅड. निकम यांनी उत्तरे दिली असून, मंगळवारी या हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांनी या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी तर आरोपींच्यातीने अ‍ॅड. वसीम मिर्झा, अ‍ॅड. दिलदार खान व अ‍ॅड. हातेकर यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय