शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यामध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 13:27 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या निधीच्या मािहतीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांच्यात सोमवारी संध्याकाळी चांगलाच वाद झाला.

अकोला: जिल्हा परिषदेच्या निधीच्या मािहतीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांच्यात सोमवारी संध्याकाळी चांगलाच वाद झाला. कार्यकारी अभियंत्याने वाडेगाव येथील सरपंच पुत्राच्या खिशातील रोकड हिसकल्याचा आरोप या युवकाने केला. या वादातच कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवरील काचावर देशमुख यांनी हात मारल्याने काच फुटल्याने हे प्रकरण सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पोहाचले. एकीकडे अधिकारी-कर्मचारी संघटना, तर दुसरीकडे शिवसैनिकांची गर्दी झाल्याने रात्री ११ वाजताच्या सुमारास हे प्रकरण आपसात मिटविण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा परिषदेत बांधकाम विभागाकडून निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्रक्रिया थांबली. सोमवारी संध्याकाळी शिवसेना सदस्य नितीन देशमुख बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांच्या कक्षात गेले. देशमुख यांनी सोनवणे यांना नियोजनाबाबतची मािहती मागितली; मात्र सोनवणे यांनी सीईओंचे नाव पुढे करीत मािहती देण्यास नकार दिला. परिणामी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातच कक्षातील टेबलवर ठेवण्यात आलेली काच फुटली. त्यामुळे हे प्रकरण पोलीस, नंतर सीईओ आयुष प्रसाद यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्याशी चर्चा केली. कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात झालेल्या वादाची उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांनी बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मािहती जाणून घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता सुनील सोनवणेदेखील होते. नितीन देशमुख व सुनील सोनवने यांच्यात वाद झाल्यानंतर दोघेही पोलीस ठाण्यात तक्रार देत असतानाच वाडेगाव येथील एका युवकानेही सोनवने यांनी १० हजार रुपये हिसकल्याची तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला; मात्र जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण आपसात करण्यात आले. शिवसैनिकांची घोषणाबाजी आरसीपी तैनातजिल्हा परिषदेत झालेल्या वादाची मािहती मिळताच शिवसैनिकांनी थेट सिटी कोतवाली पोलीस स्टेशनलामध्ये धाव घेतली. शिवसैनिकांची संख्या वाढल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आरसीपीचे जवान तैनात करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने हे कक्षातून बाहेर आले. त्यांनी शिवसैनिकांना घोषणा न देण्याचा आणि या प्रकरणाला वेगळे वळण न देण्याचा सल्ला दिला.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेना