शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्टेशन आवारातील वाहनांचा होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 12:52 IST

न्यायालयातून आदेश प्राप्त करून वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

अकोला: शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अपघातग्रस्त वाहने, कारवायातील जप्त वाहने पडून आहेत. या वाहनांचा न्यायालयाच्या आदेशानंतर लिलाव करण्यात येणार असून, पोलीस स्टेशननिहाय यादी बनविण्याकरिता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने यादी बनविण्याचा आदेश शहर पोलीस उपअधीक्षकांनी दिला आहे.अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त वाहने, तसेच पोलिसांकडून करण्यात आलेल्या विविध कारवायात जप्त करण्यात आलेली वाहने तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात पडून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही वाहने या ठिकाणी धूळ खात असून, या वाहनांना नेण्याकरिता कोणीच पुढाकार घेत नाही. तसेच वाहनांची कागदपत्रे, इन्शुरन्स यामुळे संबंधित कंपनी, विके्रते, वाहनधारक वाहन नेण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढत नसल्याचे दिसून येते. यासोबत पोलीस स्टेशन आवारात संबंधित जागा अडगळीची होऊन बसल्याने अनेक समस्यांचा सामनासुद्धा करावा लागत असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात पोलीस मित्र आशीष मधुकर सावळे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी शहर विभागातील पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना वाहनाची यादी तयार करण्याचा आदेश दिला आहे. या यादीनुसार न्यायालयातून आदेश प्राप्त करून वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचाºयांसह परिसरही मोकळा श्वास घेणार आहे. आशीष सावळे यांनी दिली दिशाविविध पोलीस स्टेशनमध्ये जमा असलेल्या वाहनांचा लिलाव करून आलेली रक्कम पोलीस फंडात जमा करावी. ही रक्कम पोलीस स्टेशनच्या इतर कामाकरिता वापरण्यात यावी यासंदर्भात आपले सरकारवर आशीष मधुकर सावळे यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल पोलीस स्टेशननिहाय यादी बनविण्याचा आदेश देण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस