शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

 हातरुण येथील मोर्णा नदीपात्रात कडबा कुट्टीचे वाहन कोसळले; चार जण बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 13:11 IST

हातरुण - मोर्णा नदीच्या काठावरून जनावरांचा चारा भरून येत असलेला पिकअप ४०७ वाहन नदीपात्रात पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी हातरुण येथे घडली. या अपघातात चार जण सुदैवाने बचावले. 

ठळक मुद्दे शेतकऱ्याच्या शेतातून कडब्याची कुट्टी पोत्यात भरून निघालेल्या ४०७ पिकअप वाहन  नदीच्या काठावरून थेट नदी पत्रात कोसळले. या वाहनात १३ ते १४ कि्वंटल कडब्याची कुट्टी भरलेले पोते होते. यामुळे वाहन व जनावरांचा चारा असे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

हातरुण - मोर्णा नदीच्या काठावरून जनावरांचा चारा भरून येत असलेला पिकअप ४०७ वाहन नदीपात्रात पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी हातरुण येथे घडली. या अपघातात चार जण सुदैवाने बचावले.  हातरुण येथील नदीकाठावर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतातून कडब्याची कुट्टी पोत्यात भरून निघालेल्या ४०७ पिकअप वाहन  नदीच्या काठावरून थेट नदी पत्रात कोसळले. एम. एच. २८ एच. ९०३० या वाहनाने दोन पलटया घेतल्या. वाहनाचे ड्रायव्हर मोहमद फारुख शे. बरामत, शे. हसन शे. मनवर, इकराम अली, शे अशपाक शे. मनवर यांना सुदैवाने कोणतीहि दुखापत झाली नाही. या वाहनात १३ ते १४ कि्वंटल कडब्याची कुट्टी भरलेले पोते होते. यामुळे वाहन व जनावरांचा चारा असे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नदीकाठावरून येत असतांना  वाहन नदीपात्रात पलटी झाल्याने सकाळच्या वेळेस शेतात जात असलेल्या शेतकऱ्यांनी यावेळी मदत करून वाहनात अडकलेल्यांना बाहेर काढले. सकाळच्या वेळेस ही घटना घडल्याने ही घटना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. नदीकाठावरून शेतात जाण्यासाठी असलेले रस्त्यांची रेतीची व मातीची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांनी दुर्दशा केल्याने अपघाताची घटना घडली आहे. अवजड वाहनांनी शेतरस्त्यांची दुरवस्था केल्याने शेतकऱ्यांना शेतातून माल घरी आणताना कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMorna Riverमोरणा नदी