यावेळी शेतकरी गटाला भाजीपाला विक्रीकरिता छत्री व कापडी पिशवीही देण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलावडे, प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ.के .बी. खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगले, अजय पराते, विजय शिराल, दीपक तायडे, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार, सहा. तंत्र व्यवस्थापक सचिन गायगोल, जितेश नालट, जय बजरंग शेतकरी गट, महात्मा फुले सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटाचे अध्यक्ष सुरेश म्हैसने, संजय भवाने, योगेश बोले, प्रफुल्ल फाले, कृषी विभागाचे रवींद्र माली, अशोक करवते, नीतेश घाटोल, सी. पी. नावकार, नागेश खराटे, धमेंद्र राठोड, शेतकरी गटामधील सदस्य उपस्थित होते.
०००००
नवमतदारांना ओळखपत्रे वाटप
अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोमवार २५ रोजी जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालये व अधिनस्त कार्यालये येथे मतदारांना शपथ देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयात नियोजन भवन सभागृह येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची उपस्थिती राहणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना छायाचित्र मतदान ओळखपत्र समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले आहे.