शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वसारीवासीयांनी गाव काढले विक्रीला!

By admin | Updated: April 4, 2016 02:12 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रकार; लोकप्रतिनिधींवर रोष, दुष्काळामुळे ग्रामस्थ हतबल.

शिरपूर जैन (जि. वाशिम): सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच शासनाकडून मदतही मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून जामदरा गावाने खरीप हंगामावरच बहिष्कार घातल्यानंतर, आता मालेगाव तालुक्यातील वसारी गाव ग्रामस्थांनी चक्क विक्रीला काढले आहे. येथील शेतकर्‍यांनी ३ एप्रिल रोजी दुपारी गावातील बसस्थानक चौकात गाव विक्रीला काढल्याचे फलक लावून ठिय्या दिला. वाशिम जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. चार, पाच वर्षांंपासून थअवर्षणामुळे अत्यल्प उत्पादन मिळत आहे. दरवर्षी नशिबी उपेक्षाच येत असल्यामुळे आता शेतकर्‍यांची परिस्थितीशी लढण्याची हिंमतच राहीलेली नाही. यातूनच आता खरीप हंगामावर बहिष्कार टाकणे, तसेच गाव विक्रीला काढणे, यासारखे निर्णय शेतकरी घेत आहेत. दुष्काळी परिस्थिती असताना शासनाने अपेक्षित मदत केली नसल्यामुळे वसारी येथील गावकर्‍यांनी रोष व्यक्त करीत, ह्यदुष्काळग्रस्तांना मदत द्या, नाही तर गाव विकत घ्याह्ण असे फलक लावून गाव विक्रीस काढले आहे. रविवारी गावातील बहुतांश नागरिकांनी हा फलक लावून आगळेवेगळे आंदोलन केले. गावातील बसस्थानक चौकात शेकडो गावकर्‍यांनी ठिय्या दिला. फलकावर ह्यआमचे आमदार, खासदार कोणी पाहिलेत का?ह्ण असा प्रश्न करीत, त्यांना शोधून देणार्‍यास दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांकडून दोन रुपये इनाम ठेवण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शिवाजी लादे, भगवान जाधव, शालिक जाधव यांच्या मार्गदर्शनात शेकडो गावकरी जमले होते. यावेळी शासन आणि लोकप्रतिनिधींबाबत रोष व्यक्त करून, ह्यदुष्काळी मदत द्या, नाही तर गाव विकत घ्याह्ण अशा घोषणाही देण्यात आल्या. खासदार, आमदार दाखवा; बक्षीस मिळवा! मालेगाव तालुक्यातील वसारी हे गाव अकोला लोकसभा मतदारसंघात येते. येथील खासदार संजय धोत्रे दहा वर्षांंपासून एकदाही गावात आले नाही, तसेच आमदार अमित झनकही लग्नप्रसंग सोडले, तर गावातील समस्या ऐकण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे आमदार, खासदार दाखवा व दोन रुपये बक्षीस मिळवा, असे फलक गावकर्‍यांनी लावले. गावात दुष्काळ असून, अजून कोणतीच मदत मिळाली नाही. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून, गावाकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी फिरकूनही पाहत नाहीत. त्यामुळे मदत मिळण्यासाठी वसारीवासीयांनी गाव विक्रीला काढले आहे.