शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

कराड येथील अपघातात वसंतबाबू खंडेलवाल जखमी

By admin | Updated: April 12, 2017 01:59 IST

अकोला: कराड येथे सोमवारी दुपारी झालेल्या कार, दुचाकी व ट्रकच्या तिहेरी अपघातात अकोल्यातील प्रख्यात उद्योजक वसंतबाबू खंडेलवाल यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाले.

तिहेरी अपघात : कार, ट्रक, दुचाकीची धडक

अकोला: सातारा जिल्ह्यातील कराड येथे सोमवारी दुपारी झालेल्या कार, दुचाकी व ट्रकच्या तिहेरी अपघातात अकोल्यातील प्रख्यात उद्योजक वसंतबाबू खंडेलवाल यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाक्यानजीक हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार व दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. वसंतबाबू हिरालाल खंडेलवाल (वय ७४) त्यांच्या पत्नी शारदा वसंतबाबू खंडेलवाल (वय ६७), तसेच वाशिम येथील लाल बहादूर सोसायटीमध्ये राहणारे एन. नरेंद्रन (वय ७४) व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी एन. नरेंद्रन (६७) यांच्यासह आनंदा गौतम बसवंत (२८, रा. कोल्हापूर नाका, मलकापूर) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. खंडेलवाल दाम्पत्य व नरेंद्रन दाम्पत्य हे वसंतबाबू खंडेलवाल यांच्या कारने (एमएच ३० ईएफ ११६१) सोमवारी दुपारी पुण्याच्या दिशेने निघाले होते. वसंतबाबू खंडेलवाल हे स्वत: कार चालवित असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर नाक्यानजीक त्यांचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कारची समोर निघालेल्या दुचाकीला (एमएच ११ एडी २१८५) धडक बसली. या धडकेनंतर कारसह मोटारसायकल कोल्हापूर नाक्यावरून हायवेवर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या मालट्रकला (एमएच ११ एफ ४२४७) धडकली. कार व मालवाहू ट्रकच्या मध्ये मोटारसायकल सापडल्याने या अपघात मोटारसायकलस्वार आनंदा बसवंत हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच अपघाताबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत माहिती देण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. कारचा चक्काचूर झाल्याने जखमी त्यामध्येच अडकून पडले होते. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना कारमधून बाहेर काढून तातडीने उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलवले. हा अपघात एवढा भीषण होता की, परिसरात काचांचा खच पडला होता. दुचाकीसह कारचाही अपघातात चक्काचूर झाला आहे. रबर स्टॉपर असूनही वाहने भरधावकोल्हापूर नाक्यावरील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी रबर स्टॉपर तयार करण्यात आले आहेत. या स्टॉपरमुळे वाहनांचे वेग कमी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र स्टॉपर असूनही चालक वेग कमी करीत नसल्याचे अनेक वेळा दिसून येते. भरधाव वेगामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.