शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

वऱ्हाडची ‘कांदा बियाणे हब’कडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 18:24 IST

बीजोत्पादनातून उत्पादन व उत्पन्न चांगले मिळत असल्याने वºहाडातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासह कांदा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: कांदा बीजोत्पादनासाठी पश्चिम (वºहाड) विदर्भातील शेती, माती व हवामान अनुकूल असून, कांदा उत्पादनासह बीजोत्पादनातून उत्पादन व उत्पन्न चांगले मिळत असल्याने वºहाडातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासह कांदा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये अकोला जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. पोषक हवामानामुळे हा भाग ‘कांदा बियाणे हब’कडे वाटचाल करीत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.पश्चिम विदर्भातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत शेतात विविध प्रयोग करीत असून, विविध पिकेही घेत आहेत. कांदा हे पीक नाशिक, पश्चिम महाराष्टÑातील मानले जाते. आता वºहाडातील शेतकऱ्यांनी कांदा पिकासह बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकरी बीजोत्पादनावर भर देत आहेत. कांदा बीजोत्पादनाला प्रति क्ंिवटल ३५ ते ५० हजार रुपये दर आहेत. त्यामुळे कांदा उत्पादनापेक्षा बीजोत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास एक हजार हेक्टरवर शेतकरी बियाणे उत्पादन घेत आहेत.कांदा बीजोत्पादनाकडे शेतकºयांचा वाढता कल बघता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बियाणे लागवड तंत्रज्ञान विकसित केले असून, तंत्रज्ञानानुसार शेतकºयांना कांद्याचे निरोगी बियाणे व लागवड पद्धत, एकरी बियाणे किती लागते, कांद्याची एकच जात पेरणी करणे अत्यावश्यक आहे. परागीकरण महत्त्वाचे आहे. म्हणूनच एका जातीपासून दुसरी कांद्याची जात एक किलोमीटर दूर पेरलेली असावी, आदींबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभाग कांदा लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देत असून, कांदा साठवणुकीसाठी चाळी तयार करण्यावर भर देत आहे.

उत्पन्नाची हमी; कंपन्यांसोबत करार!कांदा बीजोत्पादनातून एकरी चार ते पाच क्ंिवटल उत्पादन होत असून, बियाण्याला प्रति क्ंिवटल ३५ ते ५० हजार रुपये क्ंिवटल दर आहेत. विशेष म्हणजे, वºहाडातील शेतकºयांनी थेट कंपन्यांसोबत करार केला आहे. त्यामुळेच शेतकºयांना विक्रीची अडचण येत नाही.

यावर्षी पेरणी घटली!यावर्षी कांद्याचे दर गगनाला भिडल्याने कांदा पेरणीवर परिणाम झाला आहे. बीजोत्पादनावरही अल्प परिणाम झाला आहे. 

पश्चिम विदर्भातील जमीन व हवामान कांदा बीजोत्पादनासाठी प्रचंड अनुकूल असून, हा भाग ‘कांदा बियाणे हब’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. शेतकºयांना त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात येत आहे.- डॉ. एस. एम. घावडे, विभाग प्रमुख, भाजीपाला,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ