शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ६० टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:38 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला. बुलडाणा जिल्ह्यातील धरणात अद्यापही अल्प जलसाठा आहे. खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असल्याने या जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.वऱ्हाडातील अकोला , बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. ...

ठळक मुद्देया सर्व धरणांमध्ये ३० आॅगस्ट रोजी ५९.०२८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे.अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ८८.२५ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला. बुलडाणा जिल्ह्यातील धरणात अद्यापही अल्प जलसाठा आहे. खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असल्याने या जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये ३० आॅगस्ट रोजी ५९.०२८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ८८.२५ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. हा साठा ९५ टक्केपर्यंत पोहोचल्यास विसर्ग करावा लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात १०० टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ४९.७१ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ८६.७८ टक्के जलसाठा संकलित आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ६.२८ टक्के आहे. तोरणा १४.३२, तर उतावळी धरणातील पातळी ३५.८३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १७.३१ टक्के, पेनटाकळी धरणात १७.११ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.९८ टक्के, पलढगमध्ये २५.५७ टक्के, मन धरणात २४.०३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ९२ टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे. एकूणच बुलडाणा जिल्ह्याची स्थिती अद्याप सुधारली नाही.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४७.३२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील १०० पूसमध्ये, अरुणावती ९१.५९ तर बेंबळा धरणात ६०.७७ टक्केच जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण