शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

‘वंचित’ च्या जिल्हा कार्यकारिणीसाठी ५० जणांच्या मुलाखती; आज जाहीर होणार कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:25 IST

अकोला: वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणीसाठी मंगळवारी अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रमुख अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी मुलाखती घेतल्या.

अकोला: वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणीसाठी मंगळवारी अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रमुख अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी मुलाखती घेतल्या. त्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीतील विविध पदांसाठी ५० जणांनी मुलाखती दिल्या. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार असून, दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडीची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.वंचित बहुजन आघाडीची नवीन जिल्हा कार्यकारिणी तसेच युवक आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीसाठी इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे विदर्भ प्रमुख अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी घेतल्या. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदांसाठी ५० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवार, ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडीची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हा कार्यकारिणीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या वेळी माजी आमदार हरिदास भदे, माजी मंत्री डॉ.डी.एम. भांडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, शोभा शेळके, वंदना वासनिक, शंकरराव इंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.युवक आघाडी कार्यकारिणीसाठी १३ जणांच्या मुलाखती!वंचित बहुजन आघाडी युवक आघाडी जिल्हा कार्यकारिणीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये विविध पदांसाठी १३ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असून, दुपारी १२ वाजता युवक आघाडीची नवीन जिल्हा कार्यकारिणीही जाहीर करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी