शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

‘व्हॅलिडिटी’च्या गोेंधळात विद्यार्थ्यांची तारांबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 16:03 IST

वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे शासनामार्फत अद्याप कोणताही आदेश प्राप्त नाही.

ठळक मुद्देवैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठीही जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) सादर करणे आवश्यक. प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे शासनाचे कोणतेही लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नाही. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत २८ जूनपर्यंत आहे.

- संतोष येलकर

अकोला : महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) सादर करणे आवश्यक असल्याचे शैक्षणिक संस्थांकडून सांगितले जात आहे; मात्र वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे शासनामार्फत अद्याप कोणताही आदेश प्राप्त नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात ‘व्हॅलिडिटी’साठी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.विज्ञान शाखेतून इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, यावर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी सुरू झालेल्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठीही जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) सादर करणे आवश्यक असल्याचे संबंधित महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. परंतु, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे शासनाचे कोणतेही लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नाही. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत २८ जूनपर्यंत आहे. त्यानुषंगाने जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत आहे.तोंडी आदेशानुसार स्वीकारले जात आहेत प्रस्ताव!वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना अद्याप शासनाचे कोणतेही आदेश प्राप्त नाहीत. परंतु, पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) महासंचालकांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून स्वीकारण्यात येत आहेत.

   ‘या’ अभ्यासक्रमांसाठीही आता ‘व्हॅलिडिटी’आवश्यक!यापूर्वी बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झालेल्या आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते; यावर्षी सुरू झालेल्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत मात्र इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठीही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले. त्यामध्ये बीएड, डीएड, डी-फार्मसी, बी-फार्मसी, विधी शाखा, डायरेक्टर्स आॅफ आर्टस् अंतर्गत अभ्यासक्रम, एम आर्टिटेक्चर, एमबीए,बीबीएम, एमएमएस, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे.

वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्याबाबत अद्याप शासनाचे कोणतेही लेखी आदेश प्राप्त नाहीत. ‘बार्टी’ महासंचालकांच्या तोंडी आदेशानुसार विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्यात येत असून, प्रस्तावांची तपासणी करण्यात येत आहे.-संजय कदम, सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCaste certificateजात प्रमाणपत्रeducationशैक्षणिक