शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

वैशाली सामंत व प्रसन्नजित कोसंबीच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई

By admin | Updated: March 22, 2016 02:13 IST

लोकमत सखी मंचच्या ‘जल्लोष-२0१६’ ला लाभला अकोलेकरांचा उदंड प्रतिसाद.

अकोला: सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, प्रसन्नजित कोसंबी व प्रिया वैद्य यांनी हिंदी व मराठी चित्रपटांतील गीते सादर करून, 'लोकमत'चा चाहता वर्ग असलेल्या अकोलेकरांचे मन जिंकून घेतले. रविवार, २0 मार्च रोजी सायंकाळी मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या प्रांगणात ह्यलोकमतह्ण सखी मंचद्वारा आयोजित करण्यात आलेल्या 'जल्लोष-२0१६' कार्यक्रमाला अकोलेकर रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.'लोकमत' अकोला आवृत्तीच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या संगीतमय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर उज्ज्वला देशमुख, प्रा. तुकाराम बिरकड, 'लोकमत' अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले व सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी ह्यएच.पी. डान्स ग्रुपह्णच्या युवक-युवतींनी गणेश वंदना सादर केली. दीपक कडलक यांच्या बहारदार संचालनात सुरू झालेल्या या गाण्यांच्या कार्यक्रमात सर्वप्रथम कोल्हापूरचा रांगडा गायक प्रसन्नजित कोसंबी याने गोंधळ गीत सादर करून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर मराठी, हिंदीसह इतर अनेक भाषांमधून पार्श्‍वगायन करणारी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिने 'ही गुलाबी हवा..' हे गीत सादर करून रसिक प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळविला.अकोल्यात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे 'लोकमत'शी आपले ऋणानुबंधाचे कसे घट्ट झाले आहे, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करून वैशाली सामंत हिने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे ठाणेदार घनश्याम पाटील, माजी महापौर सुमनताई गावंडे, उषा विरक, मंजूषा शेळके, प्रतिभा अवचार, देवश्री ठाकरे, वैशाली शेळके, मंगला म्हैसने, गीतांजली शेगोकार, सुनीता अग्रवाल, माधुरी मेश्राम, सुजाता अहिर, सुनीता मेश्राम, देवराव अहिर, राधा बिरकड, अँड. अनंत खेळकर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील गणमान्य व्यक्ती, लोकमत सखी मंचच्या महिला सदस्य व इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.