शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनतर दुर्धर आजार असणाऱ्यांना देणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:11 IST

हे काम युद्ध पातळीवर पुर्ण  करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  कोरोना प्रतिबंधासाठी पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या लसीकरणाच्या अनुषंगाने पहिल्या फळीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंर दुर्धर आजार असलेल्या व बालकांना व नंतर सामान्य नागरिकांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, कोरोना प्रतिबंधासाठीच्या मोहिमेत  पहिल्या फळीत काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांची संख्या निश्चिती झाली नसून हे काम युद्ध पातळीवर पुर्ण  करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानुषंगाने प्रशासकीय यंत्रणेकडून जिल्ह्यातील सविस्तर माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असून अनुषंगीक विषयान्वये तीन नोव्हेंबर रोजी छोटेखानी आढावा बैठकही जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात आली असल्याची माहिती आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्याकडूनही माहिती संकलनासंदर्भात नियमित आढावा घेण्यात येत आहे. २३ ऑक्टोबर रोजीच्या प्रधान सचिवांच्या पत्राच्या अनुषंगाने त्वरित व गुणात्मक दर्जाने माहिती संकलन करण्यास यंत्रणांनी प्राधान्य देवून शासनस्तरावर मागविण्यात आलेली माहिती त्वरित सादर करण्याच्या सुचनाही दिल्या गेल्या आहेत.प्रामुख्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आयसीडी विभाग आणि जिल्ह्यातील खासगी रुग्णालये यांची यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष टिमकडून माहिती संकलीत करण्यात येत आहे. या टिममधील सदस्यांचीच छोटेखानी बैठक जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कक्षात झाल्याचे सुत्रांनी सांगितले.किमान सहा महिने संभाव्यता चालणाऱ्या या मोहिमेच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्या नेमक्या किती कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल याचा आकडा निश्चित झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का?  लस कशाा पद्धतीने देणार, त्याच्या साठवणुकीसाठी आवश्यक शितकरण उपकरणांची साखळी कितपत उपलब्ध आहे.  त्यानंतर त्याची वाहतूक, वाहन संख्या आणि या संपूर्ण मोहिमेसाठी जिल्हास्तरावर नेमका किती खर्च लागले हे मुद्दे प्रकर्षाने या माहिती संकलनामध्ये समाविष्ठ आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या