शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:00 IST

वर्गात शिकवत असताना नको तेथे स्पर्श करून विद्यार्थीनीला शिक्षकाने धमकी दिल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी उडकीस आली. या प्रकरणी आरोपी  शिक्षक जयंत श्रीकृष्ण वावगे याला अकोट शहर पोलिसांनी अटक केली. 

ठळक मुद्देअकोटात शिवसेनेचे आज शाळा बंदचे आवाहन महिला समिती सदस्यांसमोर बयान नोंदविले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/अकोट : वर्गात शिकवत असताना नको तेथे स्पर्श करून विद्यार्थीनीला शिक्षकाने धमकी दिल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी उडकीस आली. या प्रकरणी आरोपी  शिक्षक जयंत श्रीकृष्ण वावगे याला अकोट शहर पोलिसांनी अटक केली. शिक्षक जयंत वावगे हा कृषी विद्यालयात (सध्याचे भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट)  कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या घटनेमुळे पालकात रोष व्यक्त होत असून, एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने अकोट शहरातील शाळा बंदचे आवाहन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक जयंत वावगे याने वर्गामध्ये शिकवत असताना पाचव्या वर्गाच्या १0 वर्षीय   विद्यार्थिनीला होमवर्क दाखविण्याच्या उद्देशाने नको तेथे स्पर्श केला. तसेच तुला जे काही केले हे घरी सांगशील, तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकील, अशी धमकी दिली. या धमकीनंतर विद्यार्थिनी भेदरल्याने ती घटना घडल्यापासून शाळेत गेलीच नाही. त्यामुळे आई-वडिलांनी व नातेवाइकांनी तिला विश्‍वासात घेत विचारपूस केली असता, तिने वर्गात शिक्षक वावगे याने केलेला प्रकार सांगितला. त्यामुळे मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. फिर्यादीत नमूद आरोपाखाली जयंत श्रीकृष्ण वावगे रा. नयाप्रेस याचे विरुद्ध भादंवि ३५४ अ, ५0६, पास्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.  पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डी.बी. स्कॉडचे पथक पाठवून आरोपीला अटक केली. यापूर्वीसुद्धा शाळेमध्ये अशा स्वरूपाची घटना घडली होती. ही घटना घडल्यानंतरही मुलीच्या आई-वडील व नातेवाईकांनी शाळेशी संपर्क साधला, परंतु आठ दिवसांपासून कोणीही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, शिक्षक जयंत वावगे याने यापूर्वी अनेकदा असे प्रकार  केले असल्याच्या तक्रारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, अहवाल पोलिसांना अद्याप प्राप्त झाला नाही. या प्रकरणी पोलीस कसून तपास करीत असून, दोषी असणार्‍याविरुद्ध कठोर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई करीत आहेत.  

सर्व शाळा बंद ठेवण्याचे शिवसेनेचे आवाहन शाळेमध्ये विद्यार्थिनीसोबत घडलेली घटना निषेधार्थ आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होतो. घटना घडल्यानंतर शाळेशी संपर्क साधल्यानंतरही पालकांचे समाधान केले जात नसल्याने समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. अशा घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरातील सर्व शाळा आज बंद ठेवण्याचे आवाहन शिवसेनेच्यावतीने उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुकाप्रमुख श्याम गावंडे, शहरप्रमुख सुनील रंधे यांनी केले आहे. संस्था चालकांनी,  पालकांनी व विद्यार्थ्यांनी अशा घटनेला आळा घालण्याकरिता शिवसेनेच्या शाळा बंद आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत असल्याचे दिलीप बोचे यांनी सांगितले.