शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वापरलेल्या रॅपिड टेस्ट ट्युब फेकल्या उघड्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:35 IST

नगरसेवक राजू उगले यांच्या घराजवळील उकिरड्यावर या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब फेकून दिलेल्या दिसून आल्या आहेत.

- संतोषकुमार गवई लोकमत न्यूज नेटवर्कपातूर: कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी वापरलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब उघड्यावर फेकून दिल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला आहे. नगरसेवक राजू उगले यांच्या घराजवळील उकिरड्यावर या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब फेकून दिलेल्या दिसून आल्या आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे प्रशासन कोरोनाशी लढा देत असताना, दुसरी आरोग्य विभागाचे काही कर्मचारी रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब उघड्यावर फेकून देत, कोरोनाचा संसर्गाला आमंत्रण देत आहेत.गेल्या दोन दिवसांपासून पातूर शहरात कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे ४७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. नागरिकांची तपासणी करण्यासाठी वापरलेल्या काही रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब नगरसेवक राजू उगले यांच्या घरासमोरील उकिरड्यावर फेकून दिल्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युबच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव तर होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या रॅपिड टेस्ट ट्युब फेकल्या की आणखी कोणी, नगरसेवक उगले यांच्या घराजवळ या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब आल्या कशा, याची चौकशी आता सुरू झाली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ट्युब फेकल्या असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने घेणाºया वैद्यकीय चमूच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने वापरलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब सीलबंद करून घंटागाडीद्वारे डम्पिंग ग्राउंडवर नष्ट करण्यात आल्या. आता या वापरलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब उघड्यावर कोणी फेकल्या, याची चौकशी करण्यात येणार आहे आणि पोलिसात तक्रार देण्यात येणार आहे.- सोनाली यादव, मुख्याधिकारी, न.प. पातूररॅपिड अँटीजन टेस्टद्वारे ४७७ नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले. वापरलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युबचे निर्जंतुकीकरण करून एका पिशवीमध्ये त्या नष्ट करण्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडे दिल्या होत्या; परंतु भीतीचे कारण नाही. त्या रॅपिड अँटीजन टेस्ट ट्युबचे निर्जंतुकीकरण केले होते.-डॉ. विजय जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, पातूररॅपिड अँटीजन टेस्ट ट्युब उघड्यावर फेकण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर त्या टेस्ट ट्युब गोळा करण्यात आल्या आहेत. त्या टेस्ट ट्युब उघड्यावर कोणी फेकल्या, याचा तपास पोलीस करणार आहेत.-दीपक बाजड,तहसीलदार, पातूर

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याPaturपातूर