शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘जलकुं भी’ नियंत्रणासाठी किडींचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:27 IST

अकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आयात केलेल्या या किडींवर जबलपूर येथील राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर देशातील ‘जलकुंभी’वर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

ठळक मुद्देफ्लोरिडा, ऑस्ट्रेलियातून किडींची आयात; विज्ञान केंद्रात संशोधन

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आयात केलेल्या या किडींवर जबलपूर येथील राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर देशातील ‘जलकुंभी’वर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे.जलकुंभीचं मूळ ब्राझील आहे.  ही युरोप वगळता सर्व जगात पसरली. भारतात, एकोणावीसशेच्या दशकात सर्वप्रथम कोलकोता येथे फुलांचे झाड म्हणून आणलेल्या या तणवर्गीय वनस्पतीचा देशात विस्तार झाला. पाण्यातील प्राणवायू आणि जलचर प्राण्यांसाठी घातक ठरणारी ही जलकुंभी आता डोकेदुखी ठरू  लागल्याने या तणाच्या नियंत्रणासाठी १९८२ मध्ये फ्लोरीडा आणि आस्ट्रेलियातून नियोकोटीना आणि नि. बुकी (कोलीयोप्टरा, कुरकुलीयोनीडी)या दोन जातीच्या किडींची बंगरू ळ येथे आयात करण्यात आली . १९८५ मध्ये या माइट प्रजातींना बाहेरच्या वातावरणात सोडण्याची अनुमती देण्यात आली. या किडींनी जलकुंभीवर  जैविकरीत्या नियंत्रण मिळविले आहे. या अगोदर आस्ट्रेलिया, अमेरिका व सुडान या देशात सोडण्यात आलेल्या ‘माइट’ ने जलकुंभीवर नियंत्रण मिळविले. ही कीड पाने कुरतळून खाते.उष्णकटीबंधीय देशात स्वतंत्रपणे पाण्यात तरंगणारी ही तणवर्गीय वनस्पती आहे.‘आइकोर्निया क्रेसीपस’ वैज्ञानिक नाव असलेल्या वनस्पतीला हिंदी व प्रादेशिक भाषेत जलकुं भी, पटपटा व समुद्र सोख या नावाने ओळखले जाते. या वनस्पतीमुळे पाण्यातील प्राणवायू कमी होत असून, मासे व इतर जलचर प्राण्यांसाठी अत्यंत घातक ठरत आहे. २0 ते ४0 टक्के पाण्याचा प्रवाह यामुळे कमी होतो. बाष्पिभवनाचा वेगही ३ ते ८ टक्के वाढल्याचे निष्कर्ष संशोधनात समोर आले आहेत. या पृष्ठभूमीवर जबलपूर येथील विज्ञान केंद्रात संशोधन केल्यानंतर सात ते आठ वर्षांपूर्वी तेथील जलाशयात या किडींना सोडण्यात आले होते. आता या  किडींनी पूर्ण जलकु ंभीवर नियंत्रण मिळविले, तसेच मणिपूर, बंगरू ळू आणि हैद्राबाद आदी शहरातील जलकुंभी या किडींद्वारे नियंत्रित करण्यात आली.

उत्पादनाची क्षमता जलद जलकुंभीचे एक झाड पाच पाच हजार बियाणे निर्माण करते. हे बियाणे मातीत अनेक वर्ष दबून राहतात. अनुकूल परिस्थिती निर्माण होताच पुन्हा डोके वर काढतात. मूळ झाडापासून तुटलेल्या फांदय़ा दुसरे झाड तयार करतात. १0 ते १२ दिवसात जलकुंभींची संख्या दुप्पट होते.

रासायनिक फवारणी२-४ डी, ग्लाईफोसेट व पेराक्वाट या रासायनिक औषधांद्वारे फवारणी करू नही जलकुंभीवर नियंत्रण मिळवता येते; परंतु आपल्याकडे फवारणी महागडी असल्याने ते शक्य नाही.

जलकुंभीवर कीड प्रभावी नियंत्रण मिळवत असून, देशात सर्वत्र वापर होत आहे.- डॉ. सुशीलकुमार,वरिष्ठ शास्त्रज्ञ,राष्ट्रीय तणव्यवस्थापन विज्ञान संशोधन केंद्र, जबलपूर,(एम.पी.).

टॅग्स :Akola cityअकोला शहर