शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
3
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
4
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
5
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
6
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
7
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
8
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
9
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
10
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
11
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
12
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
13
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
14
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
15
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
16
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
17
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
18
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
19
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
20
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट वापरा जनजागृतीसाठी माहितीपट : अकोला जिल्हाधिकार्‍यांनी केला रस्त्यावर अभिनय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 21:44 IST

अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे दुचाकीवरून अशोक वाटिकेजवळील सिग्नलवर पोहचले, डोक्यावर हेल्मेट, रेड सिग्नल सुरू असल्याने त्यांनी आपली गाडी बंद करून सेल्फी घेतली. जिल्हाधिकारी हे काय करत आहेत, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे स्वत: माहितीपटात भूमिका वठवित आहेतसरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी केले अशोक वाटिकेसमोर चित्रीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे दुचाकीवरून अशोक वाटिकेजवळील सिग्नलवर पोहचले, डोक्यावर हेल्मेट, रेड सिग्नल सुरू असल्याने त्यांनी आपली गाडी बंद करून सेल्फी घेतली. जिल्हाधिकारी हे काय करत आहेत, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. जिल्हाधिकार्‍यांच्या प्रसिद्धीसाठी हा कुठलाही स्टंट नव्हता, तर वाहनधारकांमध्ये हेल्मेटची जनजागृती करण्यासाठी अकोल्यात निर्मित होत असलेल्या एका माहितीपटामध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे स्वत: भूमिका वठवित आहेत. त्यासाठी सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दुपारी अशोक वाटिकेसमोर चित्रीकरण करण्यात आले.  अशोक वाटिकेलगतच्या पेट्रोलपपांवर जिल्हाधिकार्‍यांची शासकीय गाडी उभी झाल्याने आधी अनेकांना कारवाई असल्याची शंका आली. अनेकांनी तर पेट्रोल पंपावर धाड पडल्याचेही जाहीर करून टाकले. जिल्हाधिकारी रस्त्यावर असल्याचे समजताच अकोल्यातील मीडियाने घटनास्थळावर धाव घेतली.  नागरिकांनही गर्दी केली मात्र खुद्द जिल्हाधिकारीच दुचाकीवर हेल्मेटसह निघाल्यावर माहितीपट चित्रीत करणार्‍याचे कॅमेर ऑन झाले अन् सारा प्रकार लक्षात आला. हेल्मेट वापरण्यासंदर्भात निर्माण केल्या जात असलेल्या माहितीपटाचे चित्रीकरण रविवारी करण्यात आले. यावेळी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक विलास पाटील आणि त्यांची ‘टीम’देखील अशोक वाटिका चौकात होती. ड्रोनने सुरू असलेल्या या शूटिंगसाठी  जिल्हाधिकार्‍यांना अनेकवेळा या चौकातूून त्या चौकात रिटेक करावा लागला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयcollectorतहसीलदारroad safetyरस्ते सुरक्षा