शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी वसुलीसाठी बनावट पावत्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:46 IST

अकोला: नळाच्या मीटरचे रिडिंग घेऊन पाणीपट्टी वसुलीसाठी चक्क बनावट पावत्यांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार जुने शहरातील डाबकी रोड परिसरात उघडकीस आला आहे.

अकोला: महान धरणातील जलसाठ्याची मोजदाद करता यावी, अकोलेकरांना दररोज नेमके किती लीटर पाण्याची आवश्यकता आहे, याची अचूक आकडेवारी प्राप्त करण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने घरोघरी अधिकृत नळ कनेक्शन देऊन मीटर लावण्याची मोहीम सुरू केली. नळाच्या मीटरचे रिडिंग घेऊन पाणीपट्टी वसुलीसाठी चक्क बनावट पावत्यांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार जुने शहरातील डाबकी रोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनपाच्यावतीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, महापालिकेचे ओळखपत्र असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला मीटर रिडिंग न देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.‘अमृत’ योजनेंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अकोलेकरांना दररोज नेमके किती लीटर पाण्याची आवश्यकता आहे, याची अचूक आकडेवारी उपलब्ध करण्यासोबतच त्याचे शुल्क अदा करावे, या उद्देशातून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी नळाला मीटर लावण्याची मोहीम सुरू केली होती. ही मोहीम अद्यापही सुरू असून, ‘अमृत’ योजनेंतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकणाऱ्या कंत्राटदाराकडून नागरिकांना अधिकृत नळ कनेक्शन दिले जात आहेत. नळाला लावण्यात आलेल्या मिटरचे रिडिंग घेण्यासाठी मनपाने खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मागील काही दिवसांपासून जुने शहरातील डाबकी रोड परिसरात मीटर रिडिंग घेतल्यानंतर संबंधित मालमत्ताधारकांना बनावट पावती देऊन पाणीपट्टी वसूल केली जात असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणाची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाला प्राप्त होताच डाबकी रोड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली आहे.ओळखपत्र तपासा!महापालिका प्रशासनाने मीटरचे रिडिंग घेणाºया एजन्सीला ओळखपत्र दिले आहेत. संबंधित एजन्सीच्या प्रतिनिधींकडे असणारे महापालिकेचे ओळखपत्र तपासूनच त्यांना मीटरचे रिडिंग देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पाणीपट्टीचा भरणा संबंधित प्रतिनिधीकडे न करता केवळ महापालिकेच्या जलप्रदाय विभागातच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पावती कशी ओळखणार?मनपाने नियुक्त केलेली एजन्सी असो वा फसवेगिरी करणाºयांकडे एकसारखे पावती बुक असल्यास संबंधित मालमत्ताधारकांना फसगत होण्याची शक्यता आहे. अशावेळी प्रशासनाने विशिष्ट प्रकारची पावती छापून त्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका