शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांचा वापर वाढला!

By admin | Updated: June 6, 2015 01:06 IST

शेतजमिनवर दुष्परिणाम; खताचा वापर योग्य प्रमाणात करण्याचा कृषीतज्ज्ञांचा सल्ला.

संतोष वानखडे/ वाशिम: शेतमालाचे उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नातून रासायनिक खतांच्या वापरावरील नियंत्रण सुटत चालले आहे. २00७-0८ या आर्थीक वर्षात प्रति हेक्टरी १0९ किलो असलेला रासायनिक खतांचा वापर २0१४-१५ या वर्षात १४७ किलोग्रॅमवर पोहचला आहे. खतांची अतिरिक्त ह्यमात्राह्ण जमिनीचा पोत बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. कृषीक्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान व उपक्रमांचा वापर केला जात आहे. पोषक जमिनीतून भरघोष उत्पादनाचे ह्यरिझल्टह्ण येत असल्याने शेतकरी जमिनीला पोषक बनविण्यासाठी रासायनिक खतांच्या वापराकडे वळले असल्याचे दिसून येते. एका र्मयादेपर्यंत रासायनिक खतांचा वापर जमिनीसाठी पोषक ठरू शकतो. रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम शेतकर्‍यांना माहित नसल्याने, खतांचा वापर करण्याची शेतकर्‍यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. या स्पर्धेतून खतांचा वापर झपाट्याने वाढत असल्याची साक्ष महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाची आकडेवारी देत आहे. खत व किटकनाशक औषधींच्या वापराविषयी काही संकेत आहेत. यानुसार खताचा सरासरी वापर दर हेक्टरी ९५ किलो ग्रॅमच्या आसपास असणे अपेक्षीत आहे. कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २00७-0८ मध्ये रासायनिक खतांचा दर हेक्टरी सरासरी वापर १0९ किलो ग्रॅम होता. २0१२-१३ या आर्थिक वर्षात प्रति हेक्टरी ११६ किलो, २0१३-१४ मध्ये ११९ किलो तर २0१४-१५ या वर्षात १४७ किलोग्रॅमवर खतांचा वापर पोचला आहे. २0१२-१३ मध्ये राज्यात ५४.७ लाख मेट्रीक टन खतांचा वापर झाला. २0१३-१४ मध्ये ५९.९ लाख मेट्रीक टन तर २0१४-१५ मध्ये ७६ लाख मेट्रीक टन खतांचा वापर झाल्याचे कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. रासायनिक खते व किटकनाशक औषधांनी कृषी क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. तर दुसरीकडे खतांचा अतिरिक्त वापर जमिनीचा पोत बिघडविणारा तर औषधींचा जादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा ठरत आहे. संभाव्य परिणाम ओळखून शेतकर्‍यांनी खतांचा वापर योग्य प्रमाणात करणे गरजेचे ठरत आहे.