शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांना मिळणार मूल्यवर्धनाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:01 IST

अकोला: शालेय स्तरावर मुलांना शिक्षण, शिस्त, संस्कार देण्यासोबतच त्यांना सुजाण नागरिक घडविण्याच्या दृष्टिकोनातून शांतीलाल मुथ्था फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील मराठी शाळा व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाचे धडे देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे राज्य शासनाच्यावतीने राज्यातील प्राथमिक मराठी व उर्दू शाळांसाठी मूल्यवर्धनाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यात १९ सुलभकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. १४१ जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका उर्दू शाळांमधील ४९0 शिक्षकांना मूल्यवर्धनासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

- नितीन गव्हाळे अकोला: शालेय स्तरावर मुलांना शिक्षण, शिस्त, संस्कार देण्यासोबतच त्यांना सुजाण नागरिक घडविण्याच्या दृष्टिकोनातून शांतीलाल मुथ्था फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील मराठी शाळा व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी अकोला जिल्ह्यातील मराठी शिक्षकांनंतर आता १४१ शाळांमधील उर्दू शिक्षकांना मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.बालवयातच मुलांवर योग्य संस्कार होतात. घरातील आईनंतर शिक्षक हे मुलांना घडवितात. घरानंतर मुले सर्वाधिक काळ शाळेत घालवितात. त्यामुळे मुलांवर संस्कार करण्याची, त्यांच्या बुद्धिमत्तेला, व्यक्तिमत्त्वाला चालना देण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर असते. मुलांना घडविण्यात शिक्षक कुठेही कमी पडू नये, या दृष्टिकोनातून शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व राज्य शासनाच्यावतीने राज्यातील प्राथमिक मराठी व उर्दू शाळांसाठी मूल्यवर्धनाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यात १९ सुलभकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता त्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर, तालुका आणि केंद्र स्तरावर जिल्ह्यातील १४१ जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका उर्दू शाळांमधील ४९0 शिक्षकांना मूल्यवर्धनासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची पुस्तकेसुद्धा उपलब्ध करण्यात आली आहेत. लवकरच या प्रशिक्षणाला सुरुवात होईल. (प्रतिनिधी) 

विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचे धडे देण्याच्या दृष्टिकोनातून उर्दू शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच १४१ उर्दू शाळांमधील ४९0 शिक्षकांना मूल्यवर्धनसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी पुस्तकेसुद्धा उपलब्ध झाली आहेत.- मोहम्मद वसिम,जिल्हा समन्वयक, मूल्यवर्धन.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक