शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उडीद, मुगाच्या उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:51 IST

बोरगाव वैराळे : बाळापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात यावर्षी उडीद, मूग या पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन न झाल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत, बियाणे खरेदी, पेरणी, डवरणी, निंदण, फवारणी, कापणी, मळणी यासाठी केलेला खर्चदेखील निघत नाही. यासोबतच मूग, उडिदाला भाव नसल्यामुळे शेतकर्‍यांना फायदा करण्यापेक्षा नुकसान करणारे ठरल्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक संकटात व्यापार्‍यांकडून होत आहे लूट!

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : बाळापूर तहसील अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे परिसरात यावर्षी उडीद, मूग या पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन न झाल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत, बियाणे खरेदी, पेरणी, डवरणी, निंदण, फवारणी, कापणी, मळणी यासाठी केलेला खर्चदेखील निघत नाही. यासोबतच मूग, उडिदाला भाव नसल्यामुळे शेतकर्‍यांना फायदा करण्यापेक्षा नुकसान करणारे ठरल्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.बोरगाव वैराळे परिसरात शेतकर्‍यांनी प्रतिएकरी पेरणीपूर्व मशागतीसाठी एक हजार, बियाणे खरेदीसाठी एक हजार, पेरणीसाठी एक हजार, डवरणी दोनदा एक हजार, निंदण ५00 रुपये, दोनदा कीटकनाशक फवारणी एक हजार, पीक कापणी प्रतिएकर १५00 रुपये, मळणी प्रतिक्विंटल ५00 रुपये असा प्रतिएकराला आतापर्यंत साडेसात हजार रुपये खर्च आला असून, प्रतिएकरात मूग, उडिदाचे पीक एक क्विंटलपेक्षा जास्त झाले नाही. जे पीक झाले, तेदेखील कापणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे रंगहीन झाले व पांढर्‍या रंगाचे झाल्यामुळे विक्रीसाठी घेऊन गेल्यानंतर बाजार समितीमधील खासगी व्यापारी दोन हजार रुपये क्विंटलने मागत असल्यामुळे झालेल्या उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणे तर सोडाच, उलट शेतकर्‍यांना प्रतिएकरी पाच हजार रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने हमी भावाने मूग, उडीद खरेदी करणे सुरू केले असले तरी शेतात उत्पादित झालेले अत्यल्प मूग, उडीद विक्रीसाठी घेऊन जाणे लहान शेतकर्‍यांना परवडत नाही. या परिस्थितीचा फायदा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खासगी व्यापारी या सर्व छोट्या-मोठय़ा शेतकर्‍यांची आर्थिक लूट करीत आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने हमीभावापेक्षा कमी भावाने मूग, उडिदाची खरेदी करणार्‍या खासगी व्यापार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांचा माल आल्यानंतर त्या मालाचे सॅम्पल खरेदीदाराकडे पाठविण्यात येते व ते खरेदीदार व्यापारी शेतकर्‍यांच्या मालाचे भाव ठरवितात. यावर शासनाने ठरविलेल्या हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याबाबत कुठलेही बंधन नसल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते.- अरुण गावंडे अडतदार, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला

मूग, उडिदाची हमी भावापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याचा प्रकार म्हणजे व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची सामूहिक लूट करण्याचा प्रकार असून, याकडे शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी निर्माण झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मंडळाची डोळेझाक म्हणजे एकप्रकारे व्यापार्‍यांना गैरप्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखे आहे.- विजय पाटील संचालक सेवा सहकारी संस्था, हातरुण

मूग, उडिदाच्या पिकांमध्ये शेतकर्‍यांना प्रति एकराला पाच ते सहा हजार रुपये तोटा सहन करावा लागला व बाजारात या पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत भरच पडली असल्याने मूग, उडीद पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांना पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यात यावी.- सुनील वैराळे, शेतकरी