अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ अंतर्गत अकोला जिल्ह्यातील शिक्षकांची मतदार यादी आठवडाभरात अद्ययावत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी सोमवारी सायंकाळी अधिकार्यांच्या आढावा बैठकीत दिले.अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर शिक्षकांची मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यानुषंगाने अकोला तहसील कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील अधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शिक्षक मतदार यादी अद्ययावत करण्याच्या जिल्ह्यातील कामाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करून आणि अपात्र नावे वगळून शिक्षकांची मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त बनसोड यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
शिक्षक मतदार यादी आठवडाभरात अद्ययावत करा!
By admin | Updated: May 20, 2014 01:03 IST