शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात अवकाळी पावसाच्या सरी; शेतकऱ्यांमध्ये धास्ती, ढगाळ वातावरणाने रब्बी पिके धोक्यात

By रवी दामोदर | Updated: January 9, 2024 18:33 IST

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पारा १४ अंशावर गेला होता.

अकोला: जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मंगळवार, दि.९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास शहरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. आगामी दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात मागील दिवसांपासून थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पारा १४ अंशावर गेला होता, परंतू आता ढगाळ वातावरणाने किमान पारा १६ ते १७ अंशावर आहे. ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तविण्यात येत असून, मंगळवारी दुपारच्या सुमारास अकोला शहरात अवकाळीच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात अचानक बदल होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. पहाटे धुके, रात्री थंडीचा कडाकाजिल्ह्यात गत तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, पहाटेच्या सुमरास दाट धुकेही पडत आहे. याचा फटका रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कारण, दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा खरीप हंगामातील कपाशी, तूर पिकासह रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकाला मोठा फटका बसला. तशीच स्थिती आता निर्माण झालेली आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांवरही धुके आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तुर काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदलघाईजिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील तुरीच्या पिकाची सोंगणीला वेग आला आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सोंगणी केलेल्या तुरीची काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदलघाई सुरू आहे. त्यात कापूस वेचणीही सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी ज्यादा मजुरी देऊन तुरीची काढणी करीत असल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस