शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
4
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
5
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
6
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
7
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
8
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
9
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
10
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
11
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
14
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
15
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
16
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
17
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
18
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 2:19 PM

बॅगची तपासणी केली असता यामध्ये धोकादायक असे काहीही न आढळल्याने प्रवाशांसह अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

अकोला: अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. एक्स्प्रेसमध्ये बेवारस बॅग असून, त्यामध्ये बॉम्ब असल्याची अफवा उडाल्याने रेल्वे पोलिसांनी तातडीने अकोला बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. एक्स्प्रेस अकोला रेल्वे स्थानकावर आल्यानंतर बॉम्ब शोधक, नाशक पथकाने बॅगची तपासणी केली असता यामध्ये धोकादायक असे काहीही न आढळल्याने प्रवाशांसह अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय मराते यांना स्टेशन मास्टर यांनी माहिती दिली की, अहमदाबाद- हावडा या एक्स्प्रेस रेल्वेमधील कोच नंबर एस-३ मधील बर्थ नं. ३३ वर एक बेवारस बॅग आढळून आली आहे. या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविले. त्यानंतर वजनदार आणि संशयास्पद दिसणारी बॅग रेल्वेतून उतरवून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. यावेळी बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. बॉम्ब शोधक पथकाने बॅगेची पाहणी केली असता ती बॅग गुजरातमधील जामनगर येथे कार्यरत असलेल्या सैनिकाची असल्याची खात्री झाली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली असून, सैनिकाशी संपर्क साधून त्याला ती बॅग सुपूर्द करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक