शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील मालमत्तांवर लावणार युनिक नंबर प्लेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:45 IST

शहरातील मालमत्तांचा शोध घेताना होणारी पायपीट कमी करण्यासोबतच नागरिकांच्या घराचा अचूक पत्ता उपलब्ध व्हावा, यासाठी सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या घरांसह इमारतींवर युनिक नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे शनिवारी मनपाच्या स्थायी समिती सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण केल्यानंतर मालमत्तांची अचूक नोंदणी करणे शक्य झाले आहे.मालमत्तांवर युनिक नंबर प्लेट लावण्यासाठी नाशिक येथील भोलानाथ स्मृती अ‍ॅण्ड कंपनीला कंत्राट दिला जाईल.

अकोला : अकोलेकरांजवळून थकीत कर वसुली करताना महापालिकेच्या मालमत्ता विभागाची दमछाक होते. शहरातील मालमत्तांचा शोध घेताना होणारी पायपीट कमी करण्यासोबतच नागरिकांच्या घराचा अचूक पत्ता उपलब्ध व्हावा, यासाठी सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या घरांसह इमारतींवर युनिक नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी मनपाच्या स्थायी समिती सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.महापालिकेचे स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांनी शहर विकासाच्या विविध विषयांवर सभेचे आयोजन केले होते. प्रशासनाने ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण केल्यानंतर मालमत्तांची अचूक नोंदणी करणे शक्य झाले आहे. नागरिकांना घरबसल्या आॅनलाइन प्रणाली किंवा पॉस मशीनद्वारे मालमत्ता कर जमा करता येणार आहे. आॅनलाइन प्रणालीचा वापर कितपत होतो, ही बाब लक्षात घेता सत्ताधारी भाजपाने मालमत्ताधारकांच्या घरावर युनिक नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मालमत्ताधारकांचा शोध घेताना प्रशासनाची पायपीट होणार नसल्याचे बोलल्या जाते. राज्यातील इतर महापालिकांमध्ये मालमत्तांवर क्रमांक टाकण्यात आले आहेत. मालमत्तांवर युनिक नंबर प्लेट लावण्यासाठी नाशिक येथील भोलानाथ स्मृती अ‍ॅण्ड कंपनीला कंत्राट दिला जाईल. स्थायी समितीच्या सभागृहात हा विषय पटलावर आला असता, कंपनीच्यावतीने प्रति मालमत्ताधारकाला ५० रुपये शुल्क आकारल्या जाणार असले, तरी शुल्क आकारणीबाबत मनपा आयुक्तांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे मत व्यक्त करीत सभापती विशाल इंगळे यांनी हा विषय मंजूर केला.

शहराचा पाचपटीने विस्तार!तत्कालीन नगर परिषदेच्या काळात शहरातील मालमत्तांवर क्रमांक टाकण्यात आले होते. आता हद्दवाढीमुळे शहराचा पाचपट विस्तार झाला असून, मालमत्तांवर क्रमांक टाकल्यास मनपासह पोलीस प्रशासनाला याचा फायदा होणार असल्याचे मत नगरसेवक अनिल गरड यांनी व्यक्त केले. प्लेटचे दर निश्चित करून या विषयाला मंजुरी देण्याची सूचना नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी केली.या विषयाला दिली मंजुरी* अग्निशमन विभागासाठी नवीन वाहनाची खरेदी* शिवसेना वसाहतमधील ११ केव्ही उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे स्थलांतरण* फुलारी गल्ली येथील मनपा मुलींची शाळा क्र. १ चे बांधकाम पूर्ण करणे* अमृत अभियानांतर्गत निर्माण केलेल्या ग्रीन झोनला ६८ लाख ८६ हजार रुपये निधीतून तारेचे कुंपण* नागरी दलित वस्तीच्या ३२ लाख निधीतून जुने शहरातील श्रीवास्तव चौक ते भीम नगर चौकपर्यंत सिमेंट रस्ता

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका