शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चक्क स्मशानभूमीत पेटविली होळी अन् उधळले रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:47 IST

या अभिनव उपक्रमात भुता-खेतांबाबतचे गैरसमजुती दुर करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

अकोला : भूत माणसाच्या डोक्यात असून स्मशानात उरतात फक्त कर्मकांडे हा संदेश देत उमरी येथील स्मशानभूमीत अकोल्यातील कवींची बहारदार मैफल रंगली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने या वर्षी पासून सुरू केलेल्या स्मशान होलीकोत्सव या अभिनव उपक्रमात भुता-खेतांबाबतचे गैरसमजुती दुर करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.अमावस्या आणि पौर्णिमेला स्मशानात भुतेजागृत होतात हा गैरसमज दूर करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महानगर शाखेच्यावतीने ‘स्मशान होलीकोत्सव ’आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंनिसचे सल्लागार शरद वानखडे,जिल्हा संघटक पुरुषोत्तम आवारे,डॉ.स्वप्ना लांडे, संध्याताई देशमुख , माणिकरवजी नालट यांची प्रमुख उपस्थिती होती.अंनिसचे महानगर संघटक चंद्रकांत झटाले यांनी प्रास्ताविक करून जगात भूत नसल्याचे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी व भूतप्रेताची भीती लोकांच्या मनातून घालविण्यासाठी हे आयोजन असल्याची माहिती दिली. यावेळी रंगलेल्या कविसंमेलनात संतोष कोकाटे, प्रा.हरिदास आखरे, गोपाल मापारी,अमोल गोंडचवर, प्रकाश भोंडे,मनोज लेखणार,गजानन छबिले,धीरज चावरे,स्वप्नील कोकाटे, राजाभाऊ देशमुख, सुनील लव्हाळे या कवींनी बहारदार कवितांचे सादरीकरण करून प्रबोधन केले.कवी संमेलन झाल्यानंतर स्मशानात होळी पेटवून व रंग खेळून स्मशानभूमी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. शेवटी स्मशानात काही खाऊ नये या मान्यतेला छेद देण्यासाठी सर्वांनी मिळून अल्पोपहार घेतला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संध्या देशमुख, अनिल लव्हाळे, शेषराव गव्हाळे, मंगेश वानखडे,दिगंबर सांगळे, धम्मदीप इंगळे,भारत इंगोले,कौशिक पाठक, श्यामराव देशमुख, नरेंद्र चिमनकर, अ‍ॅड. रवी शर्मा, विजय बुरकले, विठ्ठल तायडे, आशु उगवेकर, विकास म्हस्के , मीनल इंगोले, रिया उगवेकर, राजेश गावंडे, संदीप देशमुख, नंदिनी सांगळे, आदींसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाHoliहोळी