शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित शिक्षकांची अकोला जिल्हा परिषदेत धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 18:35 IST

वरिष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला, त्याविरोधात शेकडो शिक्षकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

ठळक मुद्देशिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या शासन स्तरावरून आॅनलाइन करण्यात आल्या. शिक्षकांना रूजू करून घेताना आॅनलाइन प्रक्रियेत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक होते. या बाबींकडे पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

अकोला : जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या १७५४ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या बदल्यामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी अद्यापही प्रसिद्ध न केल्याने अन्याय झाला. तसेच संवर्ग १ व २ मधील शिक्षकांची खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली करण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला, त्याविरोधात शेकडो शिक्षकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या शासन स्तरावरून आॅनलाइन करण्यात आल्या. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत मोठे घोळ झाले. तो घोळ उघड होण्यासाठी बदली झालेल्या शिक्षकांना रूजू करून घेताना आॅनलाइन प्रक्रियेत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक होते. या बाबींकडे पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. शिक्षकांनी केलेल्या दाव्यातील खरेपणाही तपासण्यात आला नाही. त्यामुळे इतर पात्र शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. संवर्ग २ अंतर्गत ३० किमीपेक्षा जास्त अंतर नसलेल्या शिक्षकांची तसेच संवर्ग १ ची कोणतीही तपासणी न करताच पदस्थापना देणे, सेवाज्येष्ठ शिक्षकांनी मागितलेली गावे कनिष्ठ शिक्षकांना देण्यात आली. संवर्ग चार, संवर्ग दोनमधून अर्ज केलेल्या शिक्षिकांना ३० किमीपेक्षा जास्त अंतराची गावे मागणी केल्यानुसार कशी देण्यात आली, त्यांना ३० किमीच्या आत देणे आवश्यक होते. बदली झालेल्या शिक्षकांची यादीही प्रसिद्ध केली नाही. त्यातच विस्थापित झालेल्या ५६४ शिक्षकांचीही यादी प्रसिद्ध केली नाही. त्यांना कोणी खो दिला, त्यांच्या जागेवर कोण आले, ही माहिती न मिळाल्याने वरिष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला. तो तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी शेकडो शिक्षकांनी दुपारी जिल्हा परिषदेत धाव घेतली.

विषय शिक्षकांच्या नियुक्तीची मागणीदरम्यान, शिक्षक संघटना समन्वय समितीने घेतलेल्या बैठकीत विषय शिक्षकांच्या नियुक्त्या तातडीने करा, त्यांची पदे विस्थापित शिक्षकांसाठी खुली करा, या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले. विस्थापित शिक्षक आणि उपलब्ध जागांमध्ये तफावत आहे. ५०० पेक्षाही अधिक विस्थापित शिक्षकांसाठी ५९ जागा उपलब्ध आहेत. उर्वरित ४५० पेक्षाही अधिक शिक्षकांच्या पदस्थापनेचा वांधा होणार आहे. विषय शिक्षकांची पदे बदली पोर्टलवर खुली करावी, या मागणीचे निवेदन समन्वय समितीने दिले. यावेळी शिक्षक संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी शशिकांत गायकवाड, प्रकाश चतरकर, नामदेव फाले, देवानंद मोरे, जव्वाद हुसेन, प्रमोद मोकळकर, राजेश देशमुख, शंकर तायडे, मंगेश देशपांडे, रजनीश ठाकरे, टी.एन. मेश्राम, शैलेंद्र गवई उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद