शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ऑटोला अज्ञात वाहनाची धडक, एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 14:22 IST

Accident News राष्ट्रीय महामार्गावर आसरा फाट्यावर घडला अपघात.

 मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील आसरा फाटा नजीक उभ्या अॉटोला पाठी मागून धडक दिल्याने अॉटो मध्ये बसल्या प्रवाशांपैकी एक जण ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. मूर्तिजापूर येथून माना येथे आठ ते १० प्रवाशी घेऊन जात असलेल्या अॉटो क्रमांक एमएच ३० एए १४६८ मधली अचानक वायरिंग जळाल्याने धुर निघाला चालक राजू चक्रे याने आपले वाहन थांबवून इतर प्रवाशांना खाली उतरवून राजू चक्रे (वय वर्षे २८), अनिल गोपाल कोकणे (वय वर्षे ४८) व दिनेश गंगाधर ढवळे (वय वर्षे ३४) राहणार माना हे तीघे वायरिंग तपासत असताना पाठी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनिल गोपाल कोकणे  हा ठार झाला,  तर अॉटो चालक राजू चक्रे हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याचेवर अकोला येथे उपचार करण्यात येत आहे तर दिनेश गंगाधर ढवळे हा किरकोळ जखमी झाला आहे. इतर महिला प्रवाशी महामार्गाच्या कडेला बसले असल्याने मोठा अनर्थ टळला. धडकेने अॉटो रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. दिनेश ढवळे याच्या फिर्यादी वरुन शहर पोलीसांनी अज्ञात वाहना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश उमक करीत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघातAkolaअकोला