विवरा (पातूर, जि. अकोला): पातूर तालुक्यातील चरणगाव येथील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी अज्ञात तापाने मृत्यू झाला. आरती रामदास दोडके असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती विवरा येथील स्व. बेबीताई स. इंगळे उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १२ वी मध्ये शिकत होती. दोन दिवसांपूर्वी तिला अचानक ताप आला. तापाचे निदान होण्यापूर्वीच मंगळवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनामुळे चरणगाव व विवरा येथील विद्यालया त शोककळा पसरली आहे.
चरणगाव येथील विद्यार्थिनीचा अज्ञात तापाने मृत्यू
By admin | Updated: October 8, 2014 00:38 IST