शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मार्च महिन्यात टाकले भूमिगत, ओव्हरहेड फोर-जी केबलचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 10:19 IST

टाळेबंदीचा गैरफायदा उचलत संबंधित मोबाइल कंपन्यांनी त्यांच्या केबलची पुन्हा जोडणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाची परवानगी न घेता परस्पर फायबर आॅप्टिक केबलचे भूमिगत जाळे तसेच ओव्हरहेड केबल टाकणाऱ्या मोबाइल कंपन्यांचे जाळे मनपाने खंडित केले होते. २३ मार्चपासून केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या टाळेबंदीचा गैरफायदा उचलत संबंधित मोबाइल कंपन्यांनी त्यांच्या केबलची पुन्हा जोडणी केली असून, यासंदर्भात मनपातील अनेक विभाग प्रमुखांना माहिती असल्यानंतरही संबंधित कंपनीवर वेळीच कारवाई न झाल्याने प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.महापालिका प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता विविध मोबाइल कंपन्यांनी शहरांमध्ये तब्बल ६० ते ६५ किलोमीटर अनधिकृत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकून यामध्ये मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अनेक रस्त्यांची तोडफोड करण्यात आली. रस्ते दुरुस्तीच्या बदल्यात महापालिकेकडे संबंधित मोबाइल कंपन्यांनी किमान ३५ ते ४० कोटी रुपयांचे शुल्क (रिस्टोरेशन चार्ज) जमा करणे भाग होते. सदर शुल्क जमा न करता मनपा प्रशासनाला अंधारात ठेवून मोबाइल कंपन्यांनी रात्री अनधिकृत भूमिगत केबलचे जाळे टाकले.महापालिकेतील प्रशासनासह सत्ताधाºयांनीसुद्धा झोपेचे सोंग घेतल्याचा फायदा उचलत मोबाइल कंपन्यांनी शहरातील इमारती, पथदिवे तसेच विद्युत खांब यावरून ओव्हरहेड केबलचे जाळे टाकले. या प्रकरणाची मनपाने दखल घेत भूमिगत केबल तसेच इमारती व विद्युत खांबावरील ओव्हरहेड केबलचे जाळे खंडित करून जप्त करण्याचा आदेश बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागाला दिला होता. या दोन्ही विभागांनी कंपन्यांनी टाकलेले जाळे खंडित करून ते ताब्यात घेतले. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने टाळेबंदी लागू होताच संबंधित मोबाइल कंपन्यांनी मार्च महिन्यात खंडित केलेल्या केबलची पुन्हा जोडणी केल्याची माहिती आहे.बैठकांमधून तोडगा नाहीच!केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी संबंधित मोबाइल कंपन्यांच्या कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत यासंदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचे निर्देश मनपाला दिले होते. आयुक्त संजय कापडणीस यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत तीन वेळा आयोजित बैठकांमध्ये सविस्तर चर्चा केली. शहरात अनधिकृत खोदकाम केल्यानंतर कंपन्यांनी मनपाकडे शुल्काचा भरणा करण्याची सूचना आयुक्तांनी केली असता आजपर्यंतही कंपन्यांनी शुल्काचा भरणा केला नाही, हे येथे उल्लेखनीय.

पालकमंत्री म्हणाले, कंपन्यांची मनमानी चालणार नाही!मनपाच्या परवानगीशिवाय शहरात अनधिकृत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकणाºया तसेच मोबाइल टॉवर उभारणाºया कंपन्यांची मनमानी खपवून घेणार नसल्याचा इशारा गुरुवारी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी चर्चेदरम्यान मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना दिला. संबंधित कंपन्यांवर आजपर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका