शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या खोदकामात तुटली भूमिगत वीज वाहिनी

By admin | Updated: May 22, 2017 01:05 IST

कलेक्टर आॅफिस फिडर प्रभावित : चित्रा फिडरवरून ‘बॅकफिडिंग’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील टिळक मार्गावर सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान महापारेषणच्या आपातापा येथील १३२ बाय ३३ केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या कलेक्टर आॅफिस फिडरपर्यंत जाणारी भूमिगत विद्युत वाहिनी तुटल्यामुळे कलेक्टर आॅफिस फिडरचा विद्युत पुरवठा प्रभावित झाला आहे. महावितरणने चित्रा फिडरवरून तातडीने वीजपुरवठा वळता केल्याने कलेक्टर आॅफिस फिडरवरील नागरिकांचा वीजपुरवठा अबाधित ठेवला.शहरात रस्त्यांची कामे झपाट्याने सुरू आहेत. आठ सिमेंट रस्त्यांपैकी टिळक मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सिटी कोतवाली ते जुना कपडा बाजारपर्यंतच्या रस्त्याचे खोदकाम करून त्यामध्ये मुरूम टाकून दबाई करण्याचे काम सुरू आहे. या मार्गाखालून महापारेषणच्या आपातापा केंद्रातून महावितरणच्या कलेक्टर आॅफिस फिडरपर्यंत जाणारी उच्चदाब वाहिनी टाकलेली आहे. या खोदकामादरम्यान गत तीन दिवसांपूर्वी मनुबाई कन्या शाळा आणि भंगार बाजारजवळ जेसीबीमुळे ही विद्युत वाहिनी तुटली. काम सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आधीच या वाहिनीचा वीजपुरवठा खंडित केलेला होता. दरम्यान, कलेक्टर आॅफिस फिडरचा वीजपुरवठा बंद असल्याने या फिडरवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये चित्रा फिडरवरून वीजपुरवठा वळता करण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास अवगत केले असून, येत्या दोन दिवसांत विद्युत वाहिनी दुरुस्तीची कामे पूर्ण होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.