शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल अडकले !

By admin | Updated: September 21, 2016 02:11 IST

जिल्हाधिका-यांचे निर्देश डावलले; एकाही तालुक्यातील पैसेवारीचा अहवाल २0 सप्टेंबरपर्यंंंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला नाही.

संतोष येलकरअकोला, दि. २0 - जिल्हय़ातील या वर्षीच्या खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३0 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल २0 सप्टेंबरपर्यंंंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना दिले; मात्र जिल्हय़ातील एकाही तालुक्यातील पैसेवारीचा अहवाल २0 सप्टेंबरपर्यंंंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे तालुका स्तरावर पैसेवारीचे अहवाल अडकल्याने, जिल्हय़ातील नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल केव्हा तयार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सन २0१६-१७ या वर्षीच्या जिल्हय़ातील लागवडी योग्य गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३0 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर पीक कापणी प्रयोग घेण्यात यावे आणि त्याआधारे खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल तयार करून २0 सप्टेंबरपर्यंंंत पैसेवारीचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना गत ७ सप्टेंबर रोजी दिले. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर संबंधित मंडळ अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, सरपंच, प्रगतिशील शेतकरी, सहकारी पतपुरवठा संस्थेचे अध्यक्ष, दोन अल्पभूधारक शेतकरी (एक महिला शेतकरी) आणि तलाठी इत्यादी सात सदस्यांची समिती स्थापन करून नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिल्या. नजरअंदाज पैसेवारीचे तालुका स्तरावरील अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात येणार आहे. ३0 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला आहे; मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार २0 सप्टेंबरपर्यंंंत जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात तालुक्यांपैकी एकाही तालुक्यातील नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला नाही. तालुका स्तरावर खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल रखडल्याने जिल्हय़ातील खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल केव्हा तयार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हय़ात खरीप पिकांचे असे आहे पेरणी क्षेत्र!पीक                    हेक्टरसोयाबीन             २१२८७७कापूस                 १0१९३३तूर                       ६१0१0.८खरीप ज्वारी          २२२६४मका                         ४४२मूग                       ३१८८६उडीद                     २८२00तीळ                        १३६६.११इतर पिके                   ७७0सूर्यफूल                        0२भुईमूग                        0४एकूण                    ४६0७५४.९१सोयाबीनच्या उत्पादनात घटगत महिनाभराच्या कालावधीत पावसाने दांडी मारली. त्यामुळे जिल्हय़ातील काही भागांत हाताशी आलेले सोयाबीनचे पीक सुकले. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने, शेतकरी पुन्हा संकटात सापडला. प्रशासनामार्फत खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचे अहवाल तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये उत्पादनात घट झालेल्या सोयाबीन पिकाची नजरअंदाज पैसेवारी किती निश्‍चित केली जाते, याकडे आता शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.