शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

१५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धा : अकोला १0४ धावांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:45 PM

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर रविवारी अकोला व भंडारा जिल्हा संघात  व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सातवा सामना झाला.  या सामन्यात अकोला संघाने १0४ धावांची आघाडी घेऊन विजय मिळविला. अंकित  बगरेचा याने केल्या ४४ धावा आणि कुणाल खांडे याने काढलेल्या ४२ धावा संघाच्या  विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.

ठळक मुद्देअकोला व भंडारा जिल्हा संघात रविवारी पार पडला सामनाअकोल्याच्या अंकित बगरेचा व कुणाल खांडे यांची उत्कृष्ट कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला क्रिकेट क्लब मैदानावर रविवारी अकोला व भंडारा जिल्हा संघात  व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सातवा सामना झाला.  या सामन्यात अकोला संघाने १0४ धावांची आघाडी घेऊन विजय मिळविला. अंकित  बगरेचा याने केल्या ४४ धावा आणि कुणाल खांडे याने काढलेल्या ४२ धावा संघाच्या  विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.अकोला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ४0 षटकात ९ बाद २२९ धावांचा  डोंगर अकोला संघाने रचला. सलामीचा फलंदाज कुणाल खांडे याने प्रेक्षणीय फलंदाजी  करीत ४२ धावा काढल्या. अनिकेत बगरेचा यानेदेखील उत्कृष्ट फलंदाजी करीत ४४  धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. निशांत नाईक याने ३१ धावांचे योगदान दिले. अभिषेक  सूर्यवंशी आणि प्रणय अग्रवाल यांनी प्रत्येकी २७ धावा संघाच्या खात्यात जमा केल्या.  भंडारा संघाकडून शुभम चाकोले व प्रज्वल ढोले यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रियांशू  गोपाळे, आदित्य जोगी, अविनाश खोब्रागडे, मासुम उईके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.प्रत्युत्तरात, भंडारा संघ ४५ षटकात सर्वबाद १२५ धावाच काढू शकला. अकोला संघाच्या  भेदक गोलंदाजीसमोर सलामीच्या फलंदाजांशिवाय अन्य फलंदाज फार वेळ खेळपट्टीवर  खेळू शकले नाही. ऋषिकेश शेंद्रे याने उत्तम फलंदाजी करीत ४३ धावा काढल्या. डार्विन  पडोळे याने २९ धावा काढल्या. ऋषिकेश व डार्विन दोघेही बाद झाल्यानंतर संघ दबावा खाली खेळला. हीच संधी साधून अकोला संघाने आपल्या गोलंदाजीचा भेदक मारा करू न  भंडारा संघातील फलंदाजाला पटापट तंबूत पाठविले. अकोला संघाकडून अनुज बांडे याने  भंडारा संघाचे ३ गडी बाद केले. प्रणय अग्रवालने २ गडी बाद केले. अभिषेक सूर्यवंशी,  अर्जुन इंगळे, विवेक जोशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. सामन्यात पंच म्हणून अनिल  एदलाबादकर, आशीष शुक्ला यांनी काम पाहिले. नीलेश लखाडे यांनी गुणलेखन केले.  सामन्याचे आयोजन विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना  अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आल्याची माहिती जिल्हा संयोजक भरत डिक्कर  यांनी दिली.

टॅग्स :Akola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लबCricketक्रिकेट