अस्वच्छतेचा कळस; पडीत प्रभाग बनले पैसे खाण्याचे कुरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 03:16 PM2019-08-28T15:16:52+5:302019-08-28T15:17:07+5:30

नगरसेवकांचे प्रभागातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वत्र घाण व अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र समोर आले आहे.

uncleanness; ward became a fodder camp for corporators in Akola | अस्वच्छतेचा कळस; पडीत प्रभाग बनले पैसे खाण्याचे कुरण

अस्वच्छतेचा कळस; पडीत प्रभाग बनले पैसे खाण्याचे कुरण

Next

अकोला: शहराच्या पडीत प्रभागांमध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्याचा गवगवा करणाºया कंत्राटदारांच्या कामचुकारपणाचे पितळ उघडे पाडत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी अदा केल्या जाणाºया देयकांमध्ये कपात करण्याचे धोरण आखले होते. कंत्राटदारांच्या माध्यमातून स्वत: दुकानदारी करणाºया काही नगरसेवकांचे प्रभागातील साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वत्र घाण व अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र समोर आले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात स्वच्छतेच्या मुद्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकीय प्रभाग तर खासगी सफाई कर्मचाºयांसाठी पडीत प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात स्वच्छतेची कामे करण्यास मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्याचा सूर लावला जातो. असे असले तरी पडीतप्रभागातही साफसफाईचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. काही ठराविक प्रभागातील नाल्या, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी सत्ताधारी भाजप व प्रशासनाने ५१ पडीत भागांची निर्मिती केली. त्यासाठी खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली. एका पडीत प्रभागासाठी ४८ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रशासकीय असो वा पडीत प्रभागात नाल्या, सर्व्हिस लाइन, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांसह खुल्या मैदानांची नियमित साफसफाई होणे अपेक्षित असताना आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांसह खासगी कर्मचाºयांनी साफसफाईला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांच्या वेतनातून दंडाची रक्कम कपात करण्यासोबतच पडीत प्रभागातील कंत्राटदारांच्या देयकात कपात करण्याचे धोरण आखले होते. त्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाºयांवर सोपवली होती.

झोन अधिकारी,‘एसआय’वर कारवाई नाहीच!
शहरातील प्रशासकीय तसेच पडीत प्रभागातील दैनंदिन साफसफाईचा आढावा घेण्याची जबाबदारी झोन अधिकाºयांसह आरोग्य निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे. काही झोन अधिकारी सकाळी प्रभागांमध्ये पाहणी करताना दिसत असले तरी ते ठराविक पदाधिकारी व नगरसेवकांच्याच भागाची पाहणी करीत असल्याचा आरोप नागरिक करतात. शहरात अस्वच्छतेचे किळसवाणे चित्र असताना मनपा प्रशासनाने झोन अधिकारी व आरोग्य निरीक्षकांवर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.


कुंपण शेत खात आहे!
सत्ताधारी भाजपने साफसफाईच्या नावाखाली तयार केलेले पडीत ५१ भाग सर्वपक्षीय नगरसेवकांच्या कमाईचे साधन बनले आहेत. बहुतांश प्रभागातील कंत्राट नगरसेवकांच्या नातेवाइकांचे आहेत. एका नगरसेवकाच्या दिमतीला १२ खासगी सफाई कर्मचारी नियुक्त असून, त्यांच्यावर महिन्याकाठी ९७ हजार रुपये खर्च होतो. काही प्रभाग पूर्णत: पडीत असल्याने त्या ठिकाणी ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या देयकावर महिन्याकाठी ३ लाख ८८ हजार रुपये खर्च केले जात असले तरी प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. नगरसेवक स्वत:ची खिसे भरण्यापोटी तीन किंवा चार मजुरांच्या मदतीने थातूरमातूर साफसफाईची कामे करत आहेत. कुंपणच शेत खात असल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत नागरिक विविध साथरोगांना बळी पडत आहेत.

 

Web Title: uncleanness; ward became a fodder camp for corporators in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.