शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

कावड मार्गावर अस्वच्छतेचा कळस; नगरसेवकांच्या डोळ्यांवर पट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 1:33 PM

अकोट फैल परिसर तसेच सरकारी गोदामाजवळील जंगलेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे.

अकोला: संपूर्ण देशभरात नावलौकिक प्राप्त झालेला शहरातील कावड व पालखी उत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. शिवनामाचा हा धार्मिक सोहळा पाहण्यासाठी शहरामध्ये राज्यासह देशाच्या कानाकोपºयातून भाविक दाखल होत असतानाच दुसरीकडे नगरसेवकांच्या उदासीन कारभारामुळे कावड मार्गावर अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अकोट फैल परिसर तसेच सरकारी गोदामाजवळील जंगलेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे.शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मागील काही वर्षांमध्ये शहराचा पालखी व कावड उत्सव संपूर्ण देशात नावारूपास आला आहे. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी असंख्य कावडधारी व पालखीधारक शिवभक्त रविवारी सायंकाळी गांधीग्रामकडे रवाना होतात. हा महोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपºयातून शिवभक्त गर्दी करतात. गांधीग्राम येथून अनवाणी पायी चालत कावडधारी शिवभक्त सोमवारी सकाळी शहरात दाखल होतात. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर स्वयंस्फूर्तीने जय्यत तयारी करतात. असे असले तरी सर्वसामान्यांच्या मतांवर निवडून आलेले सर्वपक्षीय नगरसेवक तसेच महापालिका प्रशासन शिवभक्तांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यात कुचराई करीत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यंदाही अकोट फैल पोलीस चौकीपासून ते मनपाच्या वैद्यकीय रुग्णालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजंूनी मातीचे ढीग आणि घाण कचरा साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.भाजप-काँग्रेसचे नगरसेवक आहेत कोठे?प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाºया अकोट फैल परिसरामध्ये सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका अनिता राजेश चौधरी, काँग्रेसच्या नगरसेविका चांदणी रवी शिंदे यासह राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले मधुकरराव कांबळे यांचे नगरसेवक पुत्र पराग कांबळे, काँग्रेसचे नगरसेवक अ‍ॅड. इक्बाल सिद्दीकी या चार नगरसेवकांचा समावेश होतो. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे किळसवाणे चित्र असताना भाजप-काँग्रेसचे नगरसेवक आहेत कोठे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.प्रशासनाच्या कर्तव्याकडे लक्षमनपाच्या हद्दवाढीनंतर पाचमोरीपर्यंतचा भाग शहरात समाविष्ट झाला आहे. साहजिकच गांधीग्राम येथून अनवाणी पायी चालत येणाºया शिवभक्तांसाठी मनपा प्रशासनाने पाचमोरी, जंगलेश्वर मंदिर परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या दोन्ही ठिकाणी साफसफाईची नितांत आवश्यकता असून, आरोग्य यंत्रणेने जंतूनाशक पावडरचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.जंगलेश्वर मंदिराला घाणीचा विळखाअकोट फैल परिसरातील सरकारी गोदामाजवळ जंगलेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी सकाळी शहरात दाखल होणाऱ्या असंख्य कावडधारी शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. सद्यस्थितीत या परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची मोठी संख्या असून, मंदिराला घाणीचा विळखा घातल्याचे चित्र आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा मागमूसही नसल्यामुळे महापालिके चा आरोग्य विभाग कोणत्या सुविधा उपलब्ध करून देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका