कावड मार्गावर अस्वच्छतेचा कळस; नगरसेवकांच्या डोळ्यांवर पट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 01:33 PM2019-08-23T13:33:52+5:302019-08-23T13:34:07+5:30

अकोट फैल परिसर तसेच सरकारी गोदामाजवळील जंगलेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे.

The uncleanness on the Kawad route; A blindfold on the eyes of a councilor | कावड मार्गावर अस्वच्छतेचा कळस; नगरसेवकांच्या डोळ्यांवर पट्टी

कावड मार्गावर अस्वच्छतेचा कळस; नगरसेवकांच्या डोळ्यांवर पट्टी

Next

अकोला: संपूर्ण देशभरात नावलौकिक प्राप्त झालेला शहरातील कावड व पालखी उत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. शिवनामाचा हा धार्मिक सोहळा पाहण्यासाठी शहरामध्ये राज्यासह देशाच्या कानाकोपºयातून भाविक दाखल होत असतानाच दुसरीकडे नगरसेवकांच्या उदासीन कारभारामुळे कावड मार्गावर अस्वच्छतेने कळस गाठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अकोट फैल परिसर तसेच सरकारी गोदामाजवळील जंगलेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे.
शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मागील काही वर्षांमध्ये शहराचा पालखी व कावड उत्सव संपूर्ण देशात नावारूपास आला आहे. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी असंख्य कावडधारी व पालखीधारक शिवभक्त रविवारी सायंकाळी गांधीग्रामकडे रवाना होतात. हा महोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपºयातून शिवभक्त गर्दी करतात. गांधीग्राम येथून अनवाणी पायी चालत कावडधारी शिवभक्त सोमवारी सकाळी शहरात दाखल होतात. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर स्वयंस्फूर्तीने जय्यत तयारी करतात. असे असले तरी सर्वसामान्यांच्या मतांवर निवडून आलेले सर्वपक्षीय नगरसेवक तसेच महापालिका प्रशासन शिवभक्तांना मूलभूत सोयी-सुविधा देण्यात कुचराई करीत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यंदाही अकोट फैल पोलीस चौकीपासून ते मनपाच्या वैद्यकीय रुग्णालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजंूनी मातीचे ढीग आणि घाण कचरा साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

भाजप-काँग्रेसचे नगरसेवक आहेत कोठे?
प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाºया अकोट फैल परिसरामध्ये सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका अनिता राजेश चौधरी, काँग्रेसच्या नगरसेविका चांदणी रवी शिंदे यासह राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले मधुकरराव कांबळे यांचे नगरसेवक पुत्र पराग कांबळे, काँग्रेसचे नगरसेवक अ‍ॅड. इक्बाल सिद्दीकी या चार नगरसेवकांचा समावेश होतो. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे किळसवाणे चित्र असताना भाजप-काँग्रेसचे नगरसेवक आहेत कोठे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाच्या कर्तव्याकडे लक्ष
मनपाच्या हद्दवाढीनंतर पाचमोरीपर्यंतचा भाग शहरात समाविष्ट झाला आहे. साहजिकच गांधीग्राम येथून अनवाणी पायी चालत येणाºया शिवभक्तांसाठी मनपा प्रशासनाने पाचमोरी, जंगलेश्वर मंदिर परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या दोन्ही ठिकाणी साफसफाईची नितांत आवश्यकता असून, आरोग्य यंत्रणेने जंतूनाशक पावडरचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जंगलेश्वर मंदिराला घाणीचा विळखा
अकोट फैल परिसरातील सरकारी गोदामाजवळ जंगलेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी सकाळी शहरात दाखल होणाऱ्या असंख्य कावडधारी शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. सद्यस्थितीत या परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची मोठी संख्या असून, मंदिराला घाणीचा विळखा घातल्याचे चित्र आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा मागमूसही नसल्यामुळे महापालिके चा आरोग्य विभाग कोणत्या सुविधा उपलब्ध करून देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Web Title: The uncleanness on the Kawad route; A blindfold on the eyes of a councilor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.