शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अकोला महापालिकेतील कला शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्यच!

By admin | Updated: June 21, 2014 01:26 IST

शिक्षकांच्या वेतनाचा भार मनपाने उचलण्याचा शेरा शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी नमूद केला.

आशिष गावंडे /अकोलामहापालिकेतील अस्थायी ३१ कला शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य असल्यामुळे या शिक्षकांच्या वेतनाचा भार मनपाने उचलण्याचा शेरा शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी स्पष्टपणे नमूद केला. कला शिक्षकांना २0१२-१३ मध्ये अदा केलेली पाचव्या वेतन आयोगाची २ लाख १४ हजारांची रक्कम नियमबाह्यरीत्या दिल्याचा ठपका ठेवत या शिक्षकांच्या वेतनाचा भार मनपा प्रशासनाने उचलण्याचे मत त्यांनी नोंदवले. वेतनाच्या ह्यऑनलाईनह्ण प्रक्रियेत कला शिक्षकांच्या समायोजनाचा मुद्दा उपस्थित झाला असून, यावर आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नऊ कला शिक्षकांना सेवेत कायम करून त्यांना सन १९९४ पासून वेतन श्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल असून, ती न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणातील तांत्रिक व कायदेशीर बाजू जाणीवपूर्वक न तपासता, १0 ऑक्टोबर २0१३ च्या सभेत ३१ कला शिक्षकांना सेवेत कायम करण्याबाबतचा ठराव ऐन वेळेवरील विषयांमध्ये मंजूर करण्यात आला होता. या प्रकाराला ह्यलोकमतह्णने वाचा फोडताच, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली. नेमक्या याच मुद्यावर शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी आक्षेप नोंदवले आहेत. अस्थायी कला शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य व प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, त्यांना पाचव्या वेतन आयोगाची रक्कम दिली कशी, असा सवाल शिक्षण उपसंचालकांनी उपस्थित केला. शिवाय अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यानंतरच ह्यऑनलाईनह्ण वेतन प्रणालीचा मार्ग खुला होणार आहे. सद्यस्थितीत ५५ मनपा शाळेत कार्यरत ३२४ शिक्षकांपैकी संच मान्यतेनुसार ३0 शिक्षक अतिरिक्त ठरले. अशावेळी ३१ अस्थायी कला शिक्षकांचे समायोजन करायचे की आस्थापनेवरील कायम शिक्षकांचे, या मुद्यावर शिक्षण विभाग बुचकळ्य़ात पडला आहे. सेवेतील कायम शिक्षकांचे समायोजन केल्यास, तो अन्याय ठरण्याची शक्यता आहे. या मुद्यावर शिक्षण विभागाने आयुक्तांकडे सादर केलेली फाईल मुख्य लेखा परीक्षक सुरेश सोळसे यांच्याकडे पाठवण्यात आली. मुळात सेवेतील कायम व अस्थायी कला शिक्षकांच्या समायोजनासंदर्भात मुख्य लेखा परीक्षकांनी निर्णय घेणे अपेक्षित असताना त्यांनी कला शिक्षकांच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील रकमेवर आक्षेप नोंदवल्याची माहिती आहे. कला शिक्षकांच्या प्रकरणात अनेकांचे हितसंबंध असल्याने यावर आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.