शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलसाठी आज अशैक्षणिक दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:29 IST

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) च्यावतीने भारतात १७ वर्षाआतील मुलांसाठी फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामधील सहा सामने नवी मुंबई येथे होणार आहेत. यासाठी राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार होऊन मुलांमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी, याकरिता महाराष्ट्र मिशन वन मिलियन फुटबॉल हा कार्यक्रम शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. १५ सप्टेंबर हा अशैक्षणिक दिवस शासनाने घोषित केला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये शुक्रवारी संपूर्ण दिवस फुटबॉल खेळाचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरात खेळणार २५ हजार विद्यार्थी!सर्व शाळांमध्ये शुक्रवारी संपूर्ण दिवस फुटबॉल खेळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) च्यावतीने भारतात १७ वर्षाआतील मुलांसाठी फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामधील सहा सामने नवी मुंबई येथे होणार आहेत. यासाठी राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार होऊन मुलांमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी, याकरिता महाराष्ट्र मिशन वन मिलियन फुटबॉल हा कार्यक्रम शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. १५ सप्टेंबर हा अशैक्षणिक दिवस शासनाने घोषित केला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये शुक्रवारी संपूर्ण दिवस फुटबॉल खेळाचे आयोजन केले आहे.शासनाने अशैक्षणिक दिवस घोषित केला असल्याने सर्व शाळांमध्ये शुक्रवारी विद्यार्थी फक्त फुटबॉल खेळणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी शाळेमध्ये मान्यवर खेळाडू, पदाधिकारी यांना सामन्यांच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करावे. सकाळी शाळेमधील किती मुले-मुली फुटबॉल खेळत आहेत. तसेच सामन्यांची संख्या किती व प्रेक्षक संख्या किती याची माहिती व्हॉटस अँपवर फोटोसह पाठवावी. यामध्ये दिरंगाई करणार्‍यांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असे फर्मानच शिक्षण विभागाने काढले आहे. दरम्यान, शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी फुटबॉल फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यामध्ये जिल्हाभरातील २५ हजार विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. जिल्हय़ातील ४९६ शाळा या उपक्रमात सहभागी होत आहेत. याकरिता ऑनलाइन नोंदणी केलेल्या ४६0 शाळांना प्रत्येकी तीन फुटबॉल व नोंदणी न केलेल्या शाळांना दोन फुटबॉल नियोजन सभेत देण्यात आले. शाळा स्तर व महाविद्यालय स्तरावर प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय वसंत देसाई क्रीडांगण व लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे दोन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक सेल्फी पॉइंट असणार आहे. मुख्य क ार्यक्रम १५ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे महाराष्ट्र मिशन फुटबॉल वन मिलियनचे प्रदर्शनी सामन्यांचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.