शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला बसस्थानकावर वाढले अनधिकृत फेरीविक्रेते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:42 IST

अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर गत काही महिन्यांपासून अनधिकृत फेरीवाल्यांची गस्त वाढली असून, त्यामुळे चोरी-चपाट्या वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर गत काही महिन्यांपासून अनधिकृत फेरीवाल्यांची गस्त वाढली असून, त्यामुळे चोरी-चपाट्या वाढण्याचे संकेत मिळत आहेत. बसस्थानकावर सीसी कॅमेऱ्यांची नजर कायम असली तरी बसस्थानकावर अनधिकृतपणे वावर करणाऱ्यांची आकडेवारीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.वास्तविक पाहता, बसस्थानकावरील गाडी फलाटानिहाय बसफेरीवाल्यांची आकडेवारी निश्चित असते. अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर नियमानुसार २० फेरीवाले अधिकृतपणे वावरू शकतात; मात्र रेकॉर्डवर तेवढेही अधिकृत फेरीवाले दिसत नाहीत. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले कायम असतात. ज्यांचे ओळखपत्रदेखील बसस्थानक प्रशासनास ठाऊक नाही, असे लोक येथे रात्रंदिवस वावरत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात तब्बल सहा महिन्यांपासून अनेक लोकांनी अर्ज केलेले आहे; मात्र त्यांच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. केवळ ११ अधिकृत परवानाधारक फेरीवाले येथे असून, इतर सर्व फेरीवाले अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रशासनाने ठरविले तर आणखी ११ फेरिवाल्यांना मंजुरी देता येते; मात्र तशी मंजुरी दिली जात नसल्याने अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भात अकोला मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Bus Standअकोला बस स्थानक