शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अनधिकृत बांधकामांचा सपाटा; नगररचना विभागाचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 13:11 IST

मनपा आयुक्त संजय कापडणीस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला : महापालिका प्रशासनाने १८६ इमारतींवर अनधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब केल्यानंतरही संबंधित मालमत्ताधारकांनी इमारतींच्या बांधकामाला पुन्हा सुरुवात केल्याचे चित्र आहे. याव्यतिरिक्त मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम केल्या जात असताना नगररचना विभागाचे दुर्लक्ष संशयाच्या घेऱ्यात सापडले आहे. यावर मनपा आयुक्त संजय कापडणीस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी १८६ इमारतींच्या दस्तावेजाची तपासणी करून जोपर्यंत नवीन ‘डीसी’ रूल मंजूर होत नाही, तोपर्यंत नियमापेक्षा जास्त बांधकाम न करण्याची सूचना वजा इशारा कंत्राटदारांना दिला होता. ‘एफएसआय’ ची समस्या लक्षात घेता सुधारित ‘डीसी रूल’लागू केल्यावरही बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे मनपाच्या निदर्शनास आले. त्यामुळे १८६ इमारतींसह ज्या इमारतींचे बांधकाम नियमापेक्षा जास्त आढळून येईल, त्यांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त संजय कापडणीस यांनी नगररचना विभागासह क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले होते. कोरोनामुळे ही मोहीम मार्च महिन्यात थांबविण्यात आली. जुलै महिन्यापासून बांधकाम व्यवसायिकांनी अनधिकृत बांधकामाचा सपाटा लावल्याचे चित्र समोर आले आहे.नगररचना विभागात राजकारणी, पदाधिकाºयांचा हस्तक्षेपमनपाची यंत्रणा कोरोनाच्या कामात गुंतली असल्याचे पाहून शहरातील काही राजकारणी व सत्तापक्षातील पदाधिकाºयांचा नगररचना विभागात हस्तक्षेप वाढल्याची माहिती आहे. राजकारण्यांच्या इशाºयावरून त्यांच्या मर्जीतील फायली निकाली काढण्यात हा विभाग व्यस्त असल्याची माहिती आहे. या प्रकाराला आयुक्त संजय कापडणीस अंकुश लावतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.

बड्या बिल्डरांना झुकते माप; सर्वसामान्य वाºयावरराज्यातील महाआयटी विभागाच्या निर्देशानुसार सर्व महापालिका, नगर परिषदांमध्ये बांधकामाची परवानगी देण्यासाठी आॅनलाइन प्रणालीचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. यासाठी ‘बीपीएमएस’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली बाजूला सारत नगररचना विभागाच्यावतीने शहरातील बड्या बिल्डरांच्या फायली तातडीने निकाली काढल्या जात आहेत. जुलै महिन्यात या विभागाने १८ बांधकाम परवानगीला मंजुरी दिली असून, यापैकी सात बांधकामे ही व्यावसायिक संकुलांची आहेत, हे उल्लेखनीय.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका