शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘फोर-जी’साठी ३९ किलोमीटर केबलचे जाळे अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 10:39 IST

३९ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबल टाकल्याचे मनपा प्रशासन व कंपनीच्या संयुक्त तपासणीत उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवत फोर-जी सुविधेच्या नावाखाली संपूर्ण शहरात अनधिकृत भूमिगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे विणणाऱ्या एका कंपनीचा प्रताप उशिरा का होईना अखेर चव्हाट्यावर आला आहे. कंपनीने शहरात दोन-चार नव्हे तर तब्बल ३९ किलोमीटर अंतराचे अनधिकृत केबल टाकल्याचे मनपा प्रशासन व कंपनीच्या संयुक्त तपासणीत उघडकीस आले असून, ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.शहरात भूमिगत फायबर आॅप्टिक केबल टाकण्यासाठी मनपा प्रशासनाची परवानगी न घेता तसेच कोट्यवधी रुपयांचा रिस्टोरेशन चार्ज (दुरुस्ती खर्च) जमा न करता एका कंपनीने शहराच्या विविध भागात खोदकाम करून अनधिकृत केबल व ‘डक’चे जाळे निर्माण केले. महापौर अर्चना मसने यांच्या प्रभागात कंपनीकडून फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार सर्वप्रथम ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर या प्रकाराची मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी गंभीर दखल घेतली. यादरम्यान, मोबाइल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व आयुक्त संजय कापडणीस यांच्यात तीन ते चार वेळा बैठका पार पडल्यानंतरही अनधिकृत केबल टाकलेच नसल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात होता. कंपनीचे अधिकारी जुमानत नसल्याचे पाहून आयुक्त कापडणीस यांनी अनधिकृत केबलच्या तपासणीचे निर्देश दिले असता तपासणीत ६४ किमी अंतराचे केबल सापडल्याचा दावा बांधकाम विभागाने केला होता.

संयुक्त तपासणीत घोळ चव्हाट्यावर

एका कंपनीने मनपाच्या तपासणीत आढळून आलेल्या ६४ किमी केबलवर आक्षेप घेत संयुक्त तपासणीची मागणी केली असता, प्रशासनाने २२ जूनपासून संयुक्त तपासणीला प्रारंभ केला. यामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीस संयुक्त तपासणीत कंपनीचे ३९ किमी अंतराचे अनधिकृत केबल आढळून आले, हे विशेष. यापैकी कंपनीने ३४ किमीचे केबल टाकल्याचे मान्य केल्याची माहिती आहे.

केंद्रीय राज्यमंत्र्यांचा ‘वॉच’ केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्याकडे मानव संसाधन व विकास यासह दूरसंचार व प्रसारण खात्याचा कारभार असल्यामुळे त्यांच्याच शहरात मोबाइल कंपन्यांनी असा घोळ केल्याची बाब ना. धोत्रे यांनी गंभीरतेने घेतली. या प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश ना. धोत्रे यांनी आयुक्त संजय कापडणीस यांना दिले होते. या संपूर्ण घडामोडींवर केंद्रीय राज्यमंत्री ‘वॉच’ ठेवून असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका