शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अँटी रॅबिज लस पुरवठा न केल्याने फर्म अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 14:02 IST

अकोला : राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयासोबत औषध पुरवठ्याचा करार करूनही श्वानदंश लस आणि औषधांचा पुरवठा न करणाऱ्या दोन फर्मवर दंडात्मक कारवाई करून काळ््या यादीत टाकण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालकांना अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाºयांनी पाठवला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रुग्णांना जवळच्या ठिकाणी श्वानदंशावर लस उपलब्ध करण्यासाठी आर्थिक तरतूद केली.यासाठी हैद्राबाद येथील ‘भारत बायोटेक’ या कंपनीला जुलै २०१७ मध्ये पुरवठा आदेश देण्यात आला.५ लाखांचा धनादेशही दिला. सातत्याने पाठपुरावा करूनही कंपनीने लसीचा लसीचा पुरवठाच केला नाही.

अकोला : राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयासोबत औषध पुरवठ्याचा करार करूनही श्वानदंश लस आणि औषधांचा पुरवठा न करणाऱ्या दोन फर्मवर दंडात्मक कारवाई करून काळ््या यादीत टाकण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालकांना अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाºयांनी पाठवला आहे. त्यामुळे दोन्ही पुरवठादार संस्थांची अडचण वाढली आहे.आरोग्य विभागात श्वानदंशावरील (अँटी रॅबिज व्हॅक्सीन) लस अत्यावश्यक औषधांच्या यादीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील रुग्णांना जवळच्या ठिकाणी श्वानदंशावर लस उपलब्ध करण्यासाठी आर्थिक तरतूद केली. त्यातून आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये या लसीचा पुरवठा व्हावा, यासाठी हैद्राबाद येथील ‘भारत बायोटेक’ या कंपनीला जुलै २०१७ मध्ये पुरवठा आदेश देण्यात आला. त्यासाठी ५ लाखांचा धनादेशही दिला. सातत्याने पाठपुरावा करूनही कंपनीने लसीचा लसीचा पुरवठाच केला नाही. या प्रकाराने ग्रामीण भागातील गरजू रुग्ण आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला वेठीस धरण्यात आले. ही बाबही पुरवठादाराने दुर्लक्षित केली. तर त्याचवेळी औषध-गोळ््यांसाठी मायक्रॉन फर्मा या कंपनीला १२ जुलै २०१७ रोजीच पुरवठा आदेश देण्यात आला. त्या कंपनीनेही औषध पुरवठा केला नाही. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला. या दोन्ही पुरवठादार फर्मवर दंडात्मक कारवाई करून त्यांना शासनाच्या काळ््या यादीत टाकावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शासनाच्या आरोग्य संचालक कार्यालयात सादर केला आहे. त्यावर कारवाई न झाल्याने प्रस्तावाचे स्मरणपत्र देण्याची तयारी आरोग्य विभागाने केली आहे.

 आरोग्य केंद्रातच लस मिळण्याची गरजप्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वर्षभरात १०,८०० लस उपलब्ध ठेवल्या जातात. या गरजेच्या तुलनेत शासनाने आधी ३२००, त्यानंतर ८०० लसींचा पुरवठा केला. हे प्रमाण पाहता वर्षभरात केवळ ४० टक्केच पुरवठा झाला आहे. परिणामी, गेल्या वर्षभरापासून श्वानदंश रुग्णांची परवड झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद