शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केबल जप्त न करण्याची कारवाई भोवली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:11 IST

महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून शहरात मोबाइल कंपन्यांनी मनमानी कारभाराचा कळस गाठल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे.

अकोला: महापालिका क्षेत्रात मोबाइल कंपन्यांनी अक्षरश: धुडगूस घातल्याचे समोर आल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी कारवाईचे हत्यार उपसले. शहरातील इमारती, विद्युत खांब, मनपाचे पथखांब आदींवरून टाकण्यात आलेले ‘ओव्हर हेड केबल’ जप्त करण्यास विद्युत विभागाकडून चालढकल केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मंगळवारी आयुक्त कापडणीस यांनी विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यादरम्यान, विद्युत विभागाने गांधी रोड, पंचायत समिती परिसरातील केबल जप्त करण्याच्या कारवाईला प्रारंभ केल्याचे समोर आले.महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून शहरात मोबाइल कंपन्यांनी मनमानी कारभाराचा कळस गाठल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. शहरवासीयांना फोर-जी सुविधा देण्याच्या नावाखाली कंपन्यांनी मनपाच्या परवानगीशिवाय सुमारे ४४ ते ४६ किलोमीटर अंतरापेक्षा जास्त खोदकाम करून फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्याची माहिती आहे. शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी स्टरलाइट टेक कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. स्टरलाइट कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याची बाब मनपाच्या तपासणीदरम्यान उघडकीस आली आहे. यावेळी स्टरलाइटने टाकलेल्या पाइपसोबतच रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मनपाच्या परवानगीशिवाय चक्क चार पाइप टाकल्याचे तपासणीत आढळून आले. याप्रकरणी दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांना बोलावून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी खुलासा मागितला असता, दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी समाधानकारक खुलासा सादर केला नाही. ही बाब ध्यानात घेता आयुक्त कापडणीस यांनी रिलायन्स जिओ तसेच स्टरलाइट कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये मोबाइल टॉवरला कुलूप लावण्यासह शहरातील इमारती, विद्युत खांब, मनपाचे पथखांब आदींवर टाकण्यात आलेल्या ‘ओव्हरहेड केबल’ जप्त करण्याचा समावेश आहे. ‘ओव्हरहेड केबल’ जप्त करण्यासंदर्भात विद्युत विभागाला आदेश जारी करूनही या विभागाकडून केबल जप्त करण्यास चालढकल केली जात असल्याचे समोर आले. या बाबीची दखल घेत मंगळवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.‘व्हेंडर’च्या विरोधात कारवाई?शासनाच्या महाटेक प्रकल्पासाठी फोर-जी केबल टाकण्याचे काम स्टरलाइट टेक कंपनीमार्फत केले जात आहे. दुसरीकडे रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडूनही अनधिकृत केबल टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन्ही कंपन्यांच्या कामासाठी पंकज अग्रवाल नामक एकाच ‘व्हेंडर’ची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हेंडरच्या विरोधातही कारवाई करण्याचे संकेत मनपाने दिले आहेत.गांधी रोड परिसरात जप्तीची कारवाईविद्युत विभागाने मंगळवारी गांधी रोड, पंचायत समिती परिसरातील मुख्य मार्गालगतचे विद्युत खांब, मनपाचे पथदिवे व काही इमारतींवरील सुमारे ८२ मीटर केबल जप्त करण्याची कारवाई केली. यावेळी काही मोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मनपाच्या कारवाईला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका