शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेसोबत बळजबरी करणाऱ्या आरोपीला दोन वर्षांचा कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 12:39 IST

अकोला: घरात घुसून विवाहितेला शारीरिक संबंधासाठी बळजबरी करणाऱ्या आरोपीला चौथे प्रथमश्रेणी न्यायाधीश एस. बी. विजयकर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला: घरात घुसून विवाहितेला शारीरिक संबंधासाठी बळजबरी करणाऱ्या आरोपीला चौथे प्रथमश्रेणी न्यायाधीश एस. बी. विजयकर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती रात्रपाळीत नोकरी करीत असल्याने ती घरात एकटी राहायची. ५ मार्च २0१४ रोजी रात्री ती घरात एकटी असताना आरोपी ओंकार शंकरराव वाघमारे (रा. मोठी उमरी) हा घरात घुसला आणि त्याने विवाहितेला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केली; परंतु विवाहितेने त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपी ओंकार वाघमारे याने तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला दोन वर्षे सश्रम कारावास व २0 हजार रुपये दंड सुनावला. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी