शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीतील आरोपींना दोन वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 13:46 IST

अकोला : प्रथमश्रेणी न्यायाधीशांनी मंगळवार, १३ नोव्हेंबर रोजी चोरीच्या खटल्यातील अरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

अकोला : प्रथमश्रेणी न्यायाधीशांनी मंगळवार, १३ नोव्हेंबर रोजी चोरीच्या खटल्यातील अरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.न्यायालयीन सूत्रांच्या माहितीनुसार, वर्ष २०१० मध्ये सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात शंकर रामदास अतकरे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, शेत सर्व्हे क्रमांक ३१ मधील विहिरीत पाण्यासाठी लावण्यात आलेल्या केबलमधील अ‍ॅल्युमिनियमची तार एक अज्ञात व्यक्ती काढत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी भाऊ बाळू श्रीकृष्ण अतकरे यांना घेऊन शेत गाठले. त्या ठिकाणी त्यांना हरिभाऊ भोनाजी काळबागे कुºहाडीच्या साहाय्याने तार तोडत असल्याचे निदर्शनास आले. दोन्ही भावंडांनी आरोपीला पकडून सिव्हिल लाइन पोलिसांच्या हवाली केले. अतकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. तपासाअंती पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी प्रथमश्रेणी न्यायाधीश ए. बी. रेडकर यांच्या न्यायालयात खटला चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे न्यायालयात पाच साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला चार महिन्यांची शिक्षा होईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय