शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांना चिरडले; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:13 IST

बोरगाव मंजू  : भरधाव मालवाहू वाहनाने चिरडल्याने दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कुरणखेडनजीक आरामशीनजवळ १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३0 वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू  : भरधाव मालवाहू वाहनाने चिरडल्याने दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कुरणखेडनजीक आरामशीनजवळ १ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३0 वाजता घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अफताबोद्दीन कलीमोद्दीन (१७)व शेख मुजबद्दीन शेख सत्तार (२0)अशी मृतांची नावे आहेत.कुरणखेड येथील अफताबोद्दीन हा त्याच्या भावाला नवीन वस्तीत शाळेत सोडून दुचाकी क्र.एमएच ३0 एएम २१७४ ने  परत येत होता. त्याच्या दुचाकीवर शे मुजबद्दीन हासुद्धा बसलेला होता. त्यांच्या दुचाकीला कुरणखेड येथील आरामशीनजवळ अकोल्याकडे जात असलेल्या मालवाहू ट्रकने जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी  एजाज खा नवाज खा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरगावमंजू पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध   गुन्हा दाखल  केला आहे. पुढील तपास  ठाणेदार पी. के. काटकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  करीत आहेत. 

महामार्गाचे चौपदरीकरण संथ गतीनेअकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अनेक अपघात घडत आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग चौपदरी करणाचा शुभारंभ दुतर्फा वृक्षतोड करून करण्यात आला होता; मात्र हे चौपदरीकरण कासव गतीने सुरू असल्याने अजूनही पूर्ण झाले नाही.  त्यात भरीस भर महामार्गावर  खड्डे पडले आहेत, तर दिशादर्शक फलक, गतिरोधकवर निशाणीसह समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.