शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

डुकरांच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 11:03 IST

प्रमोद त्र्यंबकराव गावंडे (४६, रा. काटेपूर्णा, अकोला) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बोरगाव मंजू (अकोला): रस्त्यात अचानक आडव्या आलेल्या डुकरांच्या कळपाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरून पडून एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना कानशिवणी ते वणी रंभापूर मार्गावर शनिवारी रात्री उशिरा घडली. प्रमोद त्र्यंबकराव गावंडे (४६, रा. काटेपूर्णा, अकोला) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.काटेपूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद त्र्यंबकराव गावंडे हे शनिवारी त्यांचे नातेवाईक दिनेश छबीले यांच्याकडे कानशिवणी येथे गेले होते. रात्री आपल्या गावी एम.एच.३० टी २४५२ क्रमांकाच्या मोटारसायकलने परत जात असताना सुकळी नंदापूरनजीकच्या जंगलातून डुकरांचा एक भला मोठा कळप अचानक रस्त्यावर आडवा आला. भरधाव वेगाने जात असलेले प्रमोद गावंडे यांच्या लक्षात येण्याआधीच मोटारसायकल डुकरांच्या कळपात घुसली. यामध्ये प्रमोद गावंडे खाली कोसळले. मोटारसायकलवरून कोसळण्याचा मार आणि डुकरांच्या धडकेने ते गंभीर जखमी झाले. यावेळी मागाहून येत असलेले ज्ञानेश्वर छबीले, ज्ञानेश्वर महल्ले, गजानन वसु यांनी प्रमोद गावंडे यांची डुकराच्या तावडीतून सुटका करून त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात