वाडेगाव (जि. अकोला) : वाडेगाव येथून पातूरकडे जात असलेली भरधाव दुचाकी चान्नी फाट्याजवळ घसरून झालेल्या अपघातात दोघेही दुचाकीस्वार ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजताचे दरम्यान घडली. देविदास सुरवाडे आणि सुनिल गवई अशी मृतकांची नावे असून, दोघेही पातूर येथील रहिवासी आहेत. यापैकी एकाचा मृत्यू घटनास्थळावरच, तर दुसºयाला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथे सोपीनाथ महाराज यात्रा निमिताने परिसरात व रस्त्यावर मोठी गर्दी आहे. शुक्रवारी सकाळी पातुर येथील देविदास सुरवाडे (४८)आणि सुनिल गवई (४५)हे त्यांच्या सी.जी. ०७ - ७७२२ क्रमांकाच्या बुलेट दुचाकीद्वारे वाडेगाव येथून पातूरकडे जात होते. चान्नी फाट्याजवळ त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये देविदास सुरवाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर सुनिल गवई यांना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. वाडेगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक निलेश देशमुख येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. या अपघातामुळे
पातूर-वाडेगाव मार्गावर दुचाकीचा अपघात; दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 14:30 IST
वाडेगाव (जि. अकोला) : वाडेगाव येथून पातूरकडे जात असलेली भरधाव दुचाकी चान्नी फाट्याजवळ घसरून झालेल्या अपघातात दोघेही दुचाकीस्वार ठार झाले.
पातूर-वाडेगाव मार्गावर दुचाकीचा अपघात; दोन जण ठार
ठळक मुद्देही घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजताचे दरम्यान घडली.देविदास सुरवाडे आणि सुनिल गवई अशी मृतकांची नावे असून, दोघेही पातूर येथील रहिवासी आहेत.यापैकी एकाचा मृत्यू घटनास्थळावरच, तर दुसऱ्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.