शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात दोन बळी; ९३ पॉझिटिव्ह, ७० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 19:01 IST

मंगळवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६८ झाली असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४८०९ झाली आहे.

अकोला : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ‘अनलॉक’ झालेल्या कोरोनाने जिल्ह्यात नकोशा विक्रमाला गवसणी घातली असून, मंगळवारी दिवसभरात तब्बल ९३ नव्या रुग्णांची भर पडल्याने अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा प्रथमच हजाराचा आकडा पार करत १०१३ वर पोहचला. मंगळवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६८ झाली असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४८०९ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३२९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७८ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये २२ महिला व ५६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये १५ मुर्तिजापूर येथील, गौरक्षण रोड येथील सात, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी पाच, महान व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन, तोष्णीवाल लेआऊट, जीएमसी क्वॉटर, कौलखेड, पळसो बढे, जवाहर नगर, शेकापूर ता. पातूर, केशव नगर, रणपिसे नगर व पार्वती नगर येथील प्रत्येकी दोन, वासूदेव नगर, बार्शीटाकळी, साखरविरा, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, आलेगाव, नागे लेआऊट, व्हिएचबी कॉलनी, गोयका नगर, भंडारज ता. पातूर, आरपीटीएस, गजानन पेठ, स्टेशन रोड, राजूरा प्लॉट, रेडवा ता. बार्शिटाकळी, सोपिनाथ नगर, खडकी, कृषी नगर, वाशिम बायपास, न्य तारफैल, जीएमसी हॉस्टेल व खेतान नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

लहान उमरी व वाडेगाव येथील रुग्णांचा मृत्यू मंगळवारी एकाचा उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यापैकी एज रुग्ण लहान उमरी, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष असून, त्यांना ६ सप्टेंबर रोजी दाखल झाला करण्यात आले होते. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाचाही आज दुपारी मृत्यू झाला. त्यांना ३१ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.

७० जण कोरोनामुक्तमंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ४१, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून सहा, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, तर कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून सहा अशा एकूण ७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१०१३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३६२८जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १०१३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला