शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

अकोला ते पिंजर रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 19:32 IST

अकोला ते पिंजर रस्त्यावर ११ सप्टेंबरच्या दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोल्याकडून जाणाºया विनानंबरच्या मालवाहू वाहनाने वडगाववरून पिंजरकडे जाणाºया दुचाकीला पिंजरनजीक मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातामध्ये कल्पना प्रकाश सावंत (३७) रा. वडगाव हिच्या डोक्याला जबर मार लागला आहे. दुचाकीचालक प्रकाश शंकर सावंत (३९) रा. वडगाव यांच्या हाताला व पायाला मार लागला आहे.

ठळक मुद्देदोघेजण जखमीमालवाहू वाहन घेऊन चालक पसार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंजर : अकोला ते पिंजर रस्त्यावर ११ सप्टेंबरच्या दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोल्याकडून जाणाºया विनानंबरच्या मालवाहू वाहनाने वडगाववरून पिंजरकडे जाणाºया दुचाकीला पिंजरनजीक मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातामध्ये कल्पना प्रकाश सावंत (३७) रा. वडगाव हिच्या डोक्याला जबर मार लागला आहे. दुचाकीचालक प्रकाश शंकर सावंत (३९) रा. वडगाव यांच्या हाताला व पायाला मार लागला आहे.संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे दिनेश चव्हाण, परमेश्वर शिंदे, रामेश्वर शिंदे, अरविंद सावंत यांनी या दोन्ही जखमींना घटनास्थळावरून पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ.आगलावे यांनी कल्पना सावंतला पुढील उपचारासाठी अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. संत गाडगेबाबा पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना या अपघाताची माहिती पथकाचे सदस्य अरविंद सावंत यांनी दिली आणि घटनास्थळावरून मालवाहू गाडीसह पसार झालेला चालक महानमार्गे पळाल्याचे सांगितले. पथकप्रमुख दीपक सदाफळे आणि विकी साटोटे यांनी तातडीने पथकाच्या रेस्क्यू व्हॅनने त्या दिशेने प्रवास सुरू केला. या पथकाची गाडी महानमध्ये गजाननराव वाघमारे यांच्या मेनरोडवरील मेडिकलवर पोहचली. तेथे त्यांनी अपघात करून फरार झालेल्या वाहनाबद्दल चौकशी केली. तेवढ्यातच तेथे बार्शीटाकळीहून आलेल्या शाळकरी मुलांनी दीपक सदाफळे यांना दगडपारव्याजवळ १०-१५ मिनिटांपूर्वी एका मुलाचा अपघात होऊन तो रस्त्यावर पडला असल्याची माहिती दिली. पथकप्रमुख दीपक सदाफळे यांना त्याच वाहनाने हा अपघातदेखील केला असावा, असे वाटल्याने त्या मुलाला मदत करण्यासाठी त्यांची रेस्क्यू व्हॅन बार्शीटाकळीच्या दिशेने वळविली; परंतु दगडपारवा ते बार्शीटाकळीपर्यंत जाऊनही त्या वाहनाचा व जखमी मुलाचा कुठे पत्ता लागला नाही. शेवटी पुन्हा बार्शीटाकळीवरून रेस्क्यू व्हॅन घेऊन ते घटनास्थळी पोहोचले. त्या मालवाहू गाडीला नंबरप्लेट नसल्याने तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या परिसरात दररोज त्याच प्रकारची नवीन चार ते पाच मालवाहू वाहने निंबू भरण्यासाठी येत असतात. त्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळा मॅनेज करण्यासाठी ते भरधाव प्रवास करतात. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.